Sangali News : सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत झालेल्या सत्ता नाट्यानंतर आता एकमेकांच्या बदनामीचे टूम सोडले जात आहेत. सत्ता स्थापनापूर्वी एकमेकाला हवे असलेले आणि सत्ता स्थापनेच्या वेळी दुसऱ्याच्या गोठात गेल्यानंतर त्यांना राजकीय बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांकडून सुरू आहे. याच्या केंद्रस्थानी माजी खासदार संजयकाका पाटील आहेत. महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार रोहित पाटील यांच्या गटाकडून अप्रत्यक्षपणे माजी खासदार पाटील यांनाच टार्गेट केले जात आहे. हेच नव्हे तर भविष्यातील भाजपमधील उमेदवारीचे पंख कापले जात आहेत.
सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनावेळी संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू ठेवली होती. मात्र, शेवटच्या क्षणी ते भाजपसोबत गेले. जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आली असली तरी शेवटच्या क्षणी दिलेल्या दगाबाजीचा राग अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांना आहे.
सत्ता स्थापनानंतर जयंत पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर केलेले आरोप भाजपच्या (BJP) गोठात पाटील यांना बदनाम करणारे आहेत. भाजपमध्ये जाऊन त्याची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आभार मानून भूमिका मांडली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळावी, असा प्रस्ताव संजयकाका पाटील यांनी भाजपसमोर ठेवल्याचे सांगितले जात आहे. आतापासूनच संजयकाकांना बदनाम करण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीकडून सुरू आहे.
या आरोपांना उत्तर देताना संजयकाकांनी गौप्यस्फोट केला आहे. आमदार जयंत पाटील हे वारंवार भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केले असले तरी या सर्व घडामोडीचा मी साक्षीदार असल्याचे सांगत प्रति आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचालीमध्ये आमदार रोहित पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि आमदार सुहास बाबर यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र संजयकाकांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे ही चर्चा फिसकटली असल्याची चर्चा आता सांगली जिल्ह्यात सुरू आहे. एकंदरीतच अफवांचे पेव सांगलीच्या राजकारणात फुटले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या राजकारणात सुरू आहे.
महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेवर आल्यानंतर आमदार रोहित पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्या गटात बरेचसे अंतर असल्याचे जाणवले. जयंत पाटील यांच्या गटाकडून व्हायरल करण्यात आलेल्या आभाराच्या पोस्टमध्ये माजी आमदारांचे फोटो झळकले. मात्र, आमदार रोहित पाटील यांचा उल्लेख सुद्धा या पोस्टमध्ये करण्यात आला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांमध्ये देखील बरे चालले असे नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात एकमेकाला राजकीय बदनाम करण्यासाठी परस्पर टूम सोडून डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.