Sangli ZP : सांगलीतील 4 फुटीर सदस्यांची नावं उघड : संजयकाका, राजेंद्रअण्णांच्या सदस्यांचं भाजपला मतदान, सुहास बाबर यांनाही दोघांचा धक्का

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या संगीता पाटील ३४ मते मिळवून विजयी झाल्या. भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना २५ मते मिळाली असून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
NCP Leader Sanjay Patil, Shivsena Leader Suhas Babar in Sangli ZP
NCP Leader Sanjay Patil, Shivsena Leader Suhas Babar in Sangli ZPSarkarnama
Published on
Updated on

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची निवड झाली आहे. त्यांनी तब्बल 34 मतं मिळाली. तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मतं मिळाली असून त्यांचा 9 मतांनी पराभव झाला. या निकालानंतर जिल्हा परिषदेत महायुती तर फुटलीच पण महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्षही फुटल्याचे स्पष्ट झाले.

बुधवारी सकाळी अध्यक्ष निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर भाजप-शिवसेनेच्या सर्व सदस्यांसोबत आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेनेचे अमोल बाबर, जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदमही सभागृहात दाखल झाले. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी खासदार संजय पाटील हेही तिथे आले.

त्यामुळे सुरुवातीपासून महाविकास आघाडीसोबत असलेले, महाविकास आघाडीतून निवडणूक लढलेले संजयकाका पाटील आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख भाजपसोबत गेल्याचे उघड झाले. संजयकाका समर्थक, माणेराजुरी गटातील शशिकांत जमदाडे आणि राजेंद्रअण्णा समर्थक, करगणी गटाचे विनायक मासाळ यांनी भाजपच्या उमेदवार स्वप्नाली मासाळ यांना मतदान केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य 4 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संगीता पाटील यांना मतदान केले.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेमध्येही फूट पडली. शिवसेनेचे 5 पैकी 2 सदस्य सभागृहात अनुपस्थित राहिले. यात स्वतः गटनेते, खरसुंडी गटातील सदस्य जयदीप भोसले आणि दिघंची गटातील तानाजी पाटील गैरहजर राहिले. या अनुपस्थितीचा महाविकास आघाडीला थेट फायदा झाला असता. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य शेवटच्या क्षणी भाजपसोबत गेले असते तरी महाविकास आघाडीचा सहज विजय झाला असता.

NCP Leader Sanjay Patil, Shivsena Leader Suhas Babar in Sangli ZP
Jayant Patil : संजयकाकांना आम्हीच भाजपकडे पाठवलं, तिकडच्या हालचाली त्यांनीच सांगितल्या : सांगली ZP अध्यक्षपदावर विजय मिळवताच जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत :

महायुतीमधील खदखद सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर बाहेर पडल्याचे चित्र आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यासह महायुतीमधील राष्ट्रवादीचे नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यात निकालानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला गृहीत धरण्याचे काम भाजपकडून होत असल्याचा आरोप घटक पक्षातील नेत्यांनी केला होता.

NCP Leader Sanjay Patil, Shivsena Leader Suhas Babar in Sangli ZP
मोठी बातमी : सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम : अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील

चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेत्यांना थेट आव्हान देण्याची भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते इर्षेला पेटले होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार विलासकाका जगताप, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक यांनी महाविकास आघाडीसोबतच सत्ता स्थापन करायची अशी आग्रही भूमिका घेतली होती.

संजयकाका पाटील, निशिकांत पाटील यांचा भाजपकडे कल वाढत असतानाच हे नेते मात्र भाजपला धडा शिकवायचाच असे ठरवून मैदानात उतरले होते. प्रसंगी पक्षश्रेष्ठी, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनाही अंगावर घेतले. जयंत पाटील त्यांच्यासोबत नऊ बैठका घेत जिल्हा परिषदेमधील सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. आज हे सर्व नेते महाविकास आघाडीसोबतच सत्तेत गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com