Sanjay Mandalik  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Mandalik : 'मंडलिकांना वगळून कोणी आमदार होऊ शकत नाही', माजी खासदाराचा महायुतीच्या नेत्यांना इशारा

Sanjay Mandalik assembly election mahayuti : कोल्हापूर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात मंडलिक गटाची ताकद आहे. आमच्या मंडलिक गटाला बेदखल करून चालणार नाही, असे संजय मंडलिक म्हणाले

Rahul Gadkar

Sanjay Mandalik News : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजय मंडलिक यांनी पुन्हा आपली ताकद दाखवून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हमिदवाडा कारखाना येथे सभासद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेत 'मंडलिकांना वगळून कोणी आमदार होऊ शकत नाही', असा अप्रत्यक्ष इशारा संजय मंडलिक यांनी कागलमधील महायुतीच्या नेत्यांना दिला.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर केलेले विधान सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आले आहे.

विधासभेच्या तयारीला नेते लागले आहेत. इच्छुक उमेदवार पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. त्यापार्श्वभूमीवर 'कोल्हापूर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात मंडलिक गटाची ताकद आहे. आमच्या मंडलिक गटाला बेदखल करून चालणार नाही. आमच्या गटाकडे दुर्लक्ष करून कोणालाच आमदार होता येणार नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.' अशा शब्दात माजी खासदार संजय मंडलिक Sanjay Mandalik यांनी इशारा दिला आहे.

'लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. मंडलिक यांच्यासाठी पराभव काही नवीन नाही. मात्र जनतेने दिलेली 6 लाख मतांना कमी म्हणून चालणार नाहीत. पराभवने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा', असे आवाहन माजी खासदार मंडलिक यांनी कार्यकर्त्यांना केले.

निवडणुकीची चर्चा नको

आगामी विधानसभा निवडणूक आणि झालेल्या लोकसभेची गावागावात चर्चा न करता महायुती सरकारच्या योजना घराघरात कशा पोहोचवण्याकडे लक्ष द्या,असे आवाहन माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, वीरेंद्र मंडलिक, प्रकाश पाटील, विश्वासराव कुराडे, सत्यजित पाटील, साताप्पा कांबळे, राणाप्रताप सासणे, नंदकुमार घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT