Kolhapur Loksabha News : सतेज पाटलांचा मंडलिकांना इशारा; शाहू महाराजांवर व्यक्तिगत टीकेचे धाडस करू नका...

Satej Patil मिरजकर तिकटी येथील इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचार सभेत आमदार सतेज पाटील बोलत होते.
Sanjay Mandalik, Satej Patil
Sanjay Mandalik, Satej Patilsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Loksabha News : मी अजूनही मंडलिक यांना सूचना करतोय, त्यांनी शाहू महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान टाळवेत. त्यांच्यावर बोलण्याचे धाडस करू नये, असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी दिला. मिरजकर तिकटी येथील इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचार सभेत आमदार सतेज पाटील बोलत होते.

कोल्हापूर लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूकीत शाहू छत्रपतींचा आशीर्वाद घेण्यासाठी वाड्यावर गेलेले चालते ,पण २०२४ च्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चालत नाही. हा दुटप्पीपणा बंद झाला पाहिजे, असे सांगतानाच मागील निवडणुकीत अजिंक्यताराच्या किती पायऱ्या आपण भिजवल्या झिजवल्या असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना करत चांगलेच धारेवर धरलं.

आमदार सतेज पाटील म्हणााले, २००९ च्या निवडणुकीत संभाजीराजे आणि खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याविरुध्द निवडणूक झाली पण खासदार सदाशिवराव मंडलिकाबद्दल निवडणूक प्रचारात कोणीही वाईट शब्द बोलले नाहीत. त्यांच्या वयाचा मान राखला. या निवडणुकीत टीकेची पातळी ओलांडायची नाही, असा निर्णय जिल्ह्यातील नेतेमंडळींनी घेतला होता.

Sanjay Mandalik, Satej Patil
Kolhapur Political News : राधानगरीत नेत्यांचे मनोमिलन; कार्यकर्ते मात्र संभ्रमात

पण, शाहू महाराजांच्या गादीचा मान न ठेवता खासदार मंडलिक टीका करत आहेत. त्यांनी असे धाडस करू नये, अशी सूचना आमदार पाटील यांनी दिली. या वेळी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती, आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, सह संपर्क नेते विजय देवणे, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाहू छत्रपतींना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन या वेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले. श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, देशात काँग्रेसने विकासाचा पाया घातला. देश स्वातंत्र्य झाल्यावर भाक्रा नानगल, कोयना, कोल्हापूर जिल्ह्यात वारणा, काळम्मावाडी ही मोठी धरणे बांधली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Mandalik, Satej Patil
Kolhapur Loksabha : शाहू महाराजांना न मागताच 'एमआयएम'चा पाठिंबा

दहा वर्षांत एकही नवीन धरण आणि विजेसाठी अणुभट्टी बांधलेले नाही. कोल्हापुरात हायकोर्टाचे सर्किट बेंचची उभारणी, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, युवकांना नोकरीसाठी आयटी पार्क, पर्यटनाला चालना, विमानतळ आणि रेल्वे यंत्रणात सुधारणा, खेळासाठी नवीन क्रीडांगणे या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले.

Edited By : Umesh Bambare

R.

Sanjay Mandalik, Satej Patil
Satej Patil News : 'पत्ते पिसून डाव टाकलाय, डावातला हुकमी एक्का आमच्याकडे', सतेज पाटलांनी सांगून टाकली रणनीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com