Sanjay Pawar (1).jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Pawar News: नाराज संजय पवारांनी 'मातोश्री'च्या दारातून थेटच सांगितलं; 'उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकला...'

Kolhapur Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख पदावर रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आल्यानंतर कोल्हापुरातील ठाकरेंची सेना नाराज होती. शिवाय संजय पवार यांनी देखील विरोध केला होता.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदावर रविकिरण इंगवले यांची निवड झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात कलह निर्माण झाला आहे. शिवसेना उपनेते संजय पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाराज असलेल्या पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पवार यांना मातोश्रीवर हजर राहण्याची आदेश दिले होते.

त्यामुळे आज पवार यांच्यासह कार्यकर्त्यांची फौज मुंबईत दाखल झाली. त्या ठिकाणीही पवार यांची नाराजी दूर झालेली नाही. 'मातोश्री'च्या बाहेर उभा राहून संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा निर्णय चुकला आहे. असं आम्हाला वाटत अशी प्रतिक्रिया दिली.

कोल्हापुरातून अनेक पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले होते. उद्धव ठाकरे यांनी केवळ संजय पवार (Sanjay Pawar) आणि विजय देवणे यांना बोलावून चर्चा केली. पुढे पवार म्हणाले, आमची भूमिका उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे. कोल्हापुरात कशा पद्धतीने काम होत आहे ते आम्ही सांगितले आहे.

मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांना 'वेट आणि वॉच'ची भूमिका घ्यायची असे सांगितले आहे. ठाकरे हे आमचे विठ्ठल आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट बघणार. असेही संजय पवार म्हणाले.

आमची नाराजी दूर झाली नाही. भविष्यात आम्ही एक दिलाने काम करू पण जे घडले ते आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. मी कोणावर आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही. पण जो घटनेचा ब्रिज बांधला आहे त्याला कीड लागली आहे का नाही हे देखील बघणे महत्त्वाचे आहे. निर्णय काहीही घ्या पण विश्वासात घेणे आवश्यक होते. ठाकरे यांचा निर्णय चुकलेला आहे असे आम्हाला वाटते पण, आम्ही वेट आणि वॉच ची भूमिका सध्या तरी घेणार आहोत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख पदावर रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आल्यानंतर कोल्हापुरातील ठाकरेंची सेना नाराज होती. शिवाय संजय पवार यांनी देखील विरोध केला होता. आज शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत पवार यांनी ठाकरे शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देत भावना व्यक्त केली होती. यावेळी त्यांना अश्रू अनावर देखील झाले होते.

शिवसेनेचे उपनेते संजय पवार हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याची चर्चा आता रंगली आहे. त्या संदर्भातील प्राथमिक चर्चा झाली असून उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मदतीने शिवसेनेत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोमवारी (ता.30) सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत उपनेते संजय पवार यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. जिल्हाप्रमुख निवड प्रक्रियेतून बाहेर ठेवलं, 36 वर्षे शिवसैनिक म्हणून काम केलं आहे. मी हनुमान म्हणून आयुष्यभर उद्धव ठाकरे यांच्या पायाजवळ कायम राहणार असल्याचे पवार यांनी सांगत मी शिंदेंसोबत जाणार अशी अफवा पसरवण्यात आली, मी कुठंही जाणार नाही असे देखील पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT