Sanjay Raut sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kalyan Banerjee video : संसदेच्या पायऱ्यांवर घडलं पण संजय राऊतांनी नाही पाहिलं...

Jagdeep dhankhar : जगदीप धनकड यांची नक्कल खासदाराला भोवणार

Pradeep Pendhare

Nagar : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाचे तब्बल १४१ वर खासदार निलंबित झालेत. या निलंबन सत्रात खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची केलेले नक्कल चर्चेची विषय ठरतेय. यावर खुद्द धनखड यांना पंतप्रधान मोदींनी फोन केला होता. आता शिवसेना (उबाठा) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणी आपली तिखट प्रतिक्रिया दिली. बॅनर्जी यांनी केलेली नक्कल आपण पाहिली नाही. मात्र, ती चांगली केल्यास नक्की पाहू, असे सांगत एक प्रकारे बॅनर्जी यांची पाठराखणच केली.

"कलाकार जाॅनी लिव्हर, ज्युनिअर मेहबूब, राजू श्रीवास्तव यांनी देशाला खूप हसवलं. देशाला आनंद दिला. कधी काही दुःख झाल्यावर त्यांची नक्कल बघावी. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी संसदेबाहेर कोणाची नक्कल केली आहे, हे माहित नाही. कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल चांगली केल्यास पाहू. पण त्यांनी केलेली नक्कल पाहिलेली नाही" असे राऊत म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संविधानच्या पदावर जे बसले आहेत त्यांचाच सन्मान भाजपकडून होत नाही. संविधानाचा सन्मान पंतप्रधान मोदी आणि भाजप होत नाही. परंतु विरोधी पक्षांनी सन्मान केला पाहिजे,अशी अपेक्षा असते असा टोल देखील खासदार निलंबनावर आपली प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

संसदेच्या पायऱ्यांवर बसून कल्याण बॅनर्जी हे जगदीप धनकड यांची नक्कल करत आहेत. तर, राहुल गांधी त्याचा व्हिडीओ काढत आहेत, असा व्हिडीओच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जगदीश धनकड यांनी आपली नक्कल केल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली. नक्कलेचा प्रकार लाजिरवाणा आणि आक्षेपार्ह असल्याची तिखट प्रतिक्रिया जगदीश धनखड यांनी दिली.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT