Santosh Patil-Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Shivsena UBT : ठाकरेंकडून तिसऱ्याच दिवशी डॅमेज कंट्रोल; शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुखपदाची धुरा पुन्हा तरुण शिवसैनिकाच्या खांद्यावर

Santosh Patil New Shivsena Solapur District Chief : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तीन दिवसांपूर्वी सोलापुरात मोठा धक्का बसला होता. कारण, एक माजी राज्यमंत्री, माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखाने पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Vijaykumar Dudhale

Solapur, 09 March : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तीन दिवसांपूर्वी सोलापुरात मोठा धक्का बसला होता. कारण, एक माजी राज्यमंत्री, माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखाने पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ठाकरेंकडून तातडीने सोलापुरातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक घेऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी जिल्हाप्रमुखपदाची कमान पुन्हा एकदा तरुण शिवसैनिकांच्या खांद्यावर सोपवली आहे.

अमर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाप्रमुखपदी संतोष सिद्धगोंडा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी ही घोषणा केली आहे.

संतोष पाटील यांच्या निवडीची घोषणा खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरील बैठकीत केली आहे. संतोष पाटील यांच्याकडे जिल्हाप्रमुख म्हणून अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर (Solapur) विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे. या दोन्ही मतदारसंघात पक्ष वाढविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यात शिवसेनेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण तन-मन धनाने काम करू, अशी ग्वाही संतोष पाटील यांनी दिली आहे. अमर पाटील यांच्या पक्ष सोडण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एका युवा शिवसैनिकावरच विश्वास दाखवला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान संतोष पाटील यांच्यावर असणार आहे. याशिवाय जुन्या आणि नव्यांना सोबत घेऊन संघटना वाढीसाठी पाटील यांना तातडीने पावले उचलावी लागणार आहेत. तसेच, शिवसेनेनेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विजयाचे टॉनिक द्यावे लागणार आहे.

माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. अमर पाटील यांच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तसेच उद्धव ठाकरेंनी दक्षिण सोलापूरमध्ये सभाही घेतली होती. त्यानंतरही अमर पाटील यांनी पक्ष सोडल्याने त्यांच्यावर मोठी टीका होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT