Sunil Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : जिल्हा बँकेची 'ती' भरती अवैध ? भाजपच्या नेत्याने केली राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची कोंडी..

Amol Sutar

Satara Political News : राष्ट्रवादीच्या सुनील मानेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी 58 लोकांना भरती करून घेतल्याचे जाहीर सभेत सांगितले आहे. त्यामुळे ती झालेली भरती अवैध होती का ? असा सवाल भाजपचे तत्कालीन विरोधी पक्षनेते निलेश माने यांनी उपस्थित केला आहे.

माण तालुक्यातील दहिवडी (Dahiwadi) येथील सभेत राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) गटाचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर केलेली टीका त्यांच्याच अंगलट येणार आहे. रहिमतपूर नगरपरिषदेतील भाजपचे तत्कालीन विरोधी पक्षनेते यांनी त्यांना आव्हान देत धमक असेल तर सुनील माने यांनी वेळ, काळ सांगावी आम्ही आमदार गोरे यांना घेऊन रहिमतपुरात येतो, असा इशारा दिला आहे.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे भाजप (BJP) चे निलेश माने यांनी पत्रकार परिषद घेत सुनील माने यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, माने यांचा इतिहास रद्दीच्या भावातही कोणी घेणार नाही. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी 58 लोकांना भरती करून घेतल्याचे जाहीर सभेत सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे ती झालेली भरती अवैध होती का ? असा प्रश्न निलेश माने यांनी उपस्थित केला आहे. राजकारणात कोणी कोणीचा बाप काढू नये. पण माने यांनी आमदार गोरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तुम्हाला लांब का ठेवले याचा खुलासा सुनील माने यांनी  करावा.

सुनील माने यांच्यात धमक असेल तर त्यांनी वेळ काळ सांगावी आम्ही आमदार जयकुमार गोरे यांना घेऊन रहिमतपुरात येतो,असे आव्हान निलेश माने यांनी दिले आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्याने शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाची चा्ंगलीच कोंडी करुन ठेवली आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT