Satara News : सातारा - जावळी मतदारसंघातील एका गिरणी कामगाराला म्हाडातून घर मंजूर झाले. मात्र, त्यांना घराचा ताबा मिळत नव्हता. अखेर त्या लाभार्थ्यांने सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मेसेज करून अडचण सांगितली. शिवेंद्रसिंहराजे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यास फोन केला अन् त्या गिरणी कामगाराला घराचा ताबा मिळाला.
पुणे (Pune) सारख्या शहरात गोरगरीब, गरजूंना कमी किमतीत घरे मिळावीत, यासाठी म्हाडाकडून (MHADA) लॉटरी काढली जाते. त्यासाठी गरजूंकडून अर्ज मागिवले जातात. त्यानंतर त्यामधून उपलब्ध घरे लॉटरीद्वारे पात्र असलेल्यांना दिली जातात. तरीही अनेकवेळा सोडतीत नाव आल्यानंतर घर लवकर मिळत नसल्याचे दिसून येत असते.
साताऱ्यातही असाच प्रकार समोर आला सातारा (Satara) तालुक्यातील पवारांची निगडी गावातील निलेश पवार हे सीमा पोलीस दलामध्ये भारत-चीन सीमेवर कार्यरत आहेत. या जवानाचे वडील गिरणी कामगार असल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी घर मंजूर करण्यात आले होते. त्या कामासाठी त्यांचा मुलगा 30 दिवस सुट्टीवर आला होता.
दरम्यान, त्यांची सुट्टी संपत आली तरी काम होत नसल्याने निलेश पवार निराश झाले होते. तेव्हा त्यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांना मेसेज केला. या मेसेजमध्ये म्हटले होते की, मला म्हाडाकडून सदनिकेची चावी मिळवून देण्यासाठी मदत करावी. माझे वडील वयस्कर असल्याने त्यांना एकट्याला मुंबईला जाणं-येणं शक्य नाही. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, याप्रकरणी शिवेंद्रसिंहराजे यांनी कसा पाठपुरावा केल्या यांचा एक व्हिडिओही पाहायला मिळत आहे. तसेच भाजप सरकार आणि त्यांचे मंत्री, आमदार हे सामान्य माणसासाठी किती कार्यरत असतात, असेही यातून बोलल्याचे पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील गिरणी कामगार शरद पवारांना एका फोनमुळे म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2020 मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील 125 पात्र गिरणी कामगार आणि वारस यांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आले. या कार्यक्रमाला शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वतः उपस्थित होते. ते म्हाडा समितीचे सदस्य आहेत.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.