Satara Political News : सातार लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार उदयनराजे भोसले असतील हे निश्चित मानले जात आहे. उदयनराजेंनी देखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, अजुनही उदयनराजे Udayanraje Bhosale यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कराड येथील महायुतीच्या मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंच्या उमेदवारीवर भाष्य केले.
'भारत महासत्ता करण्याचे स्वप्न मोदींच्या माध्यमातून पूर्णत्वाला न्यायचे आहे. जगात कुठेही जावा आपल्याला सन्मानाची वागणूक मिळते, ही काँग्रेसच्या काळात मिळत नव्हती. आपला खासदार जो कोणी असेल महायुतीचा मोदीजींसोबत (Narendra modi) काम करणारा तसेच मतदारसंघाची प्रगती साधणारा खासदार निवडून आणायचा आहे. उमेदवारी जाहीर झालेली नाही पण उदयनराजे इच्छुक आहेत. कदाचित तेच उद्याचे उमेदवार असणार आहेत.', असे शिवेंद्रसिंहराजे (ShivendraRaje) म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कराड येथील महायुतीच्या मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, अतुल भोसले, नरेंद्र पाटील, आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, भरत पाटील, विक्रमबाबा पाटणकर, रामचंद्र वेताळ, काकासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
कोट्यवधीचा निधी केंद्र सरकारकडून मिळाल्योन मोठ्याप्रमाणात कामे होत आहेत. जे नेतृत्व आपल्याला कोट्यवधीचा निधी देऊन कामे करत असेल त्याच्या पाठीशी आपण ताकतीने उभे राहायचे आहे. मोदी व राज्य सरकारवरही विरोधक टीका करत आहेत. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी सध्या विरोधकांची अवस्था झाली आहे, असा टोला विरोधकांना शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला.
आपल्या भागाचे अर्थकारण ऊसाभोवती फिरते. त्याकडे काँग्रेस सरकारने दुर्लक्ष केले होत. त्या काळात साखर कारखान्यांचा आयकर भरण्याबाबतचा प्रश्न बिकट झाला होता. मात्र, अमित शाह यांनी मोदीजींच्या माध्यमातून त्याचे गांभीर्य ओळखून तो प्रश्न सोडवला.अन्यथा, आम्हा सगळ्या सहकारी साखर कारखानादारांना राजीनामा द्यावा लागला असता, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.
आता सातारची महायुतीची गेलेली जागा परत मिळविण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. आता त्यांनी आता जोर लावावा. आमचा काय छोटासा मतदारसंघ आहे. पण पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सातारची जागा निवडून आणली म्हणून त्यांचेच नाव होईल आणि कौतूकही होईल, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.