Udyanraje Bhosale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha News : उदयनराजेंनी ठोकला शड्डू; श्रीनिवास पाटलांचे आव्हान पेलणार का?

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara Loksabha News : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज लोकसभेची निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याने सातारा लोकसभेत त्यांची आणि राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गटाचे ) श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपसह महायुतीची ताकद वाढली आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे व श्रीनिवास पाटील अशी सरळ लढत झाल्यास 2019च्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती होणार की सातारची जनता राजेंना साथ देणार, याचीच जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

सातारा महायुतीतील दावेबाजीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघ सध्या हॉट बनला आहे. या मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून आणण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानुसार सध्याचे भाजपचे (BJP ) राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी पुढच्या दाराने खासदार होण्यासाठी शड्डू ठोकला आहे. त्यांना अद्यापपर्यंत भाजपकडून तिकीट देण्याबाबत कोणीही सूतोवाच केलेलं नाही, पण स्वतःहून उदयनराजे भोसले यांनी तयारी केली आहे, तर दुसरीकडे महायुतीत सातारा लोकसभेवर शिवसेनेने दावा केला आहे. महायुतीच्या सर्व निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सातारा मतदारसंघासाठी त्यांच्याकडूनही आग्रह होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच नव्याने सरकारमध्ये समावेश झालेले राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही सातारा लोकसभेच्या जागेवर दावा केला असून, तीन मार्चला साताऱ्यात मेळावा घेऊन ते रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे महायुतीत कोणा एकाच्या नावावर एकमत होणे सहजासहजी शक्य नाही. त्यामुळे शिवसेना (Shivsena) किंवा राष्ट्रवादीतील (NCP) इच्छुकाकडून बंडखोरी होण्याची भीती आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज पुण्यात उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा लढण्याचे सूतोवाच केले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) यांच्या उमेदवाराचे आव्हान वाटत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील ( Shrinivas Patil ) किंवा कराड भागातील उमेदवार दिल्यास खासदार उदयनराजे भोसले यांना ही निवडणूक अडचणीची ठरणार आहे. तर वेगळा उमेदवार दिल्यास उदयनराजेंना ही निवडणूक (Election ) सोपी होणार आहे, पण महायुतीतील एकजूट निवडणुकीपर्यंत राहिली तर हे सर्व शक्य होणार आहे.

Edited By: Rashmi Mane

R

SCROLL FOR NEXT