Prakash Ambedkar, Udayanraje Bhosale, Shashikant shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha Constituancy : 'वंचित' बिघडविणार साताऱ्यात कोणाचे गणित..?

Prashant Kadam माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांना वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे.

हेमंत पवार

Satara Loksabha News : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडुन शशिकांत शिंदे यांच्यात लढत आहे. या निवडणुकीत सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रिंगणात उतरलेले माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी जिल्ह्यात सैनिकांची साडेतीन ते चार लाख मते असल्याचा दावा केला आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बहुजन आघाडीची मते महायुती की महाआघाडी यातील कोणाचे गणित बिघडवणार, याचीच धास्ती नेत्यांना आहे. त्यांच्या उमेदवारमुळे खासदारकीपासून कोण वंचित राहणार ? याकडे मतदारसंघाचे लक्ष आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महायुतीचे उदयनराजे व महाविकासचे शशिकांत शिंदे यांच्यातच चुरशीची लढत आहे. या निवडणुकीत आपल्यालाच जादा मते मिळुन विजयी व्हावे, यासाठी दोन्ही उमेदवार, त्यांचे पक्ष आणि समर्थकांनी व्यूव्हरचना आखली आहे. त्यासाठी दोन्ही उमेदवारांनी सातारा जिल्ह्यातील तालुके-गावे, मोठी शहरे पिंजुन काढण्याचा सपाटा लावला आहे.

त्यातल्या त्यात कऱ्हाड-पाटण तालुक्यावर दोन्ही उमेदवारांनी भर दिला आहे. महायुती व महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रयत्नांची शिकस्त करत असतानाच दोन आठवड्यापुर्वी सातारा जिल्हा माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनीही हुतात्मा जवान आणि आजी - माजी सैनिकांच्या कुटूंबीय यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सरकारकडून ठोस कार्यवाही झाली नाही. त्यांना देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही.

त्यामुळेच आता हुतात्मा जवानांचे कुटूंबीय, आजी - माजी सैनिक, त्यांचे कुटूंबिय यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा माजी सैनिक फेडरेशनच्या माध्यमातुन सातारा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीने त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणुन जाहीर केले आहे. मतदारांची बेरीज सांगून कदम म्हणाले, राजकीय पक्षांना आमची ताकद कळेल.

त्यासाठी त्यांनीही महिनाभरापासून संपर्कावर भर देवुन मते फुटु नयेत, यासाठी फिल्डींग लावली आहे. त्यामुळे वंचित आघाडीची ही मते ही या निवडणुकीत महत्वाची ठरेल. त्याची धास्ती महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे वंचितची मते कोणाचे गणित बिघडवणवार ? याकडेही जिल्ह्याचे लक्ष आहे.

मतदानाचे गणित..

जिल्ह्यात आजी - माजी, हुतात्मा जवानांची संख्या ५२ हजार आहे. पॅरामिल्ट्री फोर्सेस जवानांची संख्या ३० हजार आहे. त्यानुसार जिल्ह्यात जवानांच्या कुटूंबियांची संख्या ८२ हजारांहून अधिक आहे. प्रत्येक कुटूंबात चार ते पाच मतदार पकडल्यास सैनिकांशी निगडीत जिल्ह्यात सुमारे साडेतीन ते चार लाख मतदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सैनिकांची फुटणारी मते वाचण्यासाठी...

सातारा लोकसभेसाठी चिंचणेर वंदन येथील माजी सैनिक दिलीप बर्गे यांनी भारतीय जवान किसान पार्टीतुन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेवुन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत कदम यांना पाठिंबा दिला आहे. सैनिकांचा आवाज संसदेत पोचण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे बर्गे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सैनिकांची फुटणारी मते ही कदम यांच्या पाठिशी राहतील, असाही त्यांना विश्वास आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT