Narendra Modi Rally sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramdas Athawale News : ' शिंदे निवडणुकीला उभे राहून फसले, उदयनराजे...', आठवलेंच्या कवितांनी सभेत भरला रंग

Udayanraje Bhosale : सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज (सोमवार) कराड (सैदापूर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमी प्रमाणे कविता सादर करुन रंगतदार भाषण केले.

Umesh Bambare-Patil

Loksabha Election : कराडच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कवितांनी सभेत रंग भरला. 'शशिकांत शिंदे निवडणुकीला उभे राहून फसले, कारण निवडून येणार आहेत उदयनराजे भोसले' या चारोळीनेच आठवलेंनी आपल्या भाषणाची सुरवात केली.उपस्थितांनी आठवलेंच्या कवितांना दाद दिली.

सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज (सोमवार) कराड (सैदापूर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमी प्रमाणे कविता सादर करुन रंगतदार भाषण केले.

शशिकांत शिंदे Shashikant Shinde निवडणुकीला उभे राहून फसले, कारण निवडून येणार आहेत उदयनराजे भोसले अशा चारोळीने सुरवात करुन केद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थितांनी सभेत रंग भरला. शिंदेची भानगड पाहून वाशीचे लोक हसले, आणि उदयनराजे Udayanraje Bhosale लोकसभेत जाऊन बसले. साताऱ्यात झाली आहे, उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची एकी, त्यामुळे राष्ट्रवादी वाल्यांची फिरली आहेत डोकी. अशा चोरोळ्या मांडल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री आठवले म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मजबूत करायचे आहे, देशाची लोकशाही बळकट करायची आहे. जगात देशाला प्रथम क्रमांकावर न्यायचे आहे. देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोदींची विचारधारा घराघरात पोहोचवा. 'सबका साथ सबका विकास हीच आहे मोदींची विचारधारा. त्यांच्या विचाराला साथ म्हणजे उदयनराजेंना मत देणे असे आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन केले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT