Vikram Pawaskar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : भाजपच्या पावसकरांवर कारवाई का नाही ? सातारा, सांगली पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara News : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील घटनेप्रकरणी व द्वेषमूलक वक्तव्ये करण्यात भूमिका असलेले भाजपचे नेते विक्रम पावसकर यांच्या विरोधात सातारा व सांगली पोलिसांनी का कारवाई केली नाही ? यासंदर्भात दोन आठवड्यांत मुंबई उच्च न्यायालयात म्हणणे सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने दिला.

सातारा व सांगली पोलिसांनी कारवाई न करण्याच्या कृतीबद्दलही मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्न विचारला आहे.‌ 10 सप्टेंबर 2023 रोजी पुसेसावळी येथे ही घटना घडली. विटा, इस्लामपूर आणि सातारा जिल्ह्यातील कराड व पुसेसावळी येथे भाजपचे नेते विक्रम पावसकर यांनी भावना भडकवणारी विधाने केली होती.

त्यासंदर्भात शाकीर इसालाल तांबोळी यांनी महाराष्ट्र सरकार व सातारा आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक व इतरांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल रिटपिटीशन दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते - डेरे व न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या पिठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. त्यानुसार आदेश देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते तांबोळी यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तांबोळी यांच्या वतीने ॲड. लारा देसाई व ॲड. संस्कृती याज्ञिक हे दोघे काम पाहत आहेत, तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने वरिष्ठ सरकारी वकील एच. एस. वेणेगावकर व सहायक सरकारी वकील पी. पी. शिंदे यांनी काम पाहिले. तर अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळेपर्यंत आपण न्यायालयीन लढा लढत राहू, असे याचिकाकर्ते शाकीर तांबोळी यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT