Satara loksabha News : मुख्यमंत्र्यांचा पुरुषोत्तम जाधवांना ग्रीन सिग्नल; म्हणाले, सातारा लोकसभा लढूया..!

Program at Naigaon : नायगाव येथील कार्यक्रम संपल्यावर हेलिकॉप्टरमध्ये बसताना सर्वासमोरच मुख्यमंत्र्यांचा होकार...
CM Eknath Shinde, Purushottam Jadhav
CM Eknath Shinde, Purushottam JadhavSarkarnama
Published on
Updated on

Satara loksabha news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुषोत्तम जाधव यांना सातारा लोकसभेची निवडणूक लढण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. काल नायगाव येथील कार्यक्रम  संपल्यावर हेलिकॉप्टरमध्ये बसताना जाधव यांनी सर्वासमोरच मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगितले, त्यांनी होकार देत सातारा लोकसभा लढूया, तयारी करा असे सांगितले.

सातारा लोकसभा मतदारसंघावरून सध्या महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. भाजपने या मतदारसंघात आपलाच खासदार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी तोफ डागत सातारा लोकसभेवर शिवसेनेचा हक्क असून यावेळेस या मतदारसंघातुन निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.

CM Eknath Shinde, Purushottam Jadhav
Ram Mandir Ayodhya : आमदारांनंतर आता भाजपच्या मंत्र्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र; एकनाथ शिंदे काय घेणार निर्णय?

तर उपमुख्यमंत्री अजित पवार गट ही या मतदारसंघावर दावा सांगत आहे. त्यासाठी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी अजितदादांना हा मतदारसंघ हवा आहे. त्यातच भाजपचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यापूर्वीच पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढणार म्हणून शड्डू ठोकला आहे.

पण शिवसेनेच्या वतीने पुरुषोत्तम जाधव यांनी तर पूर्ण तयारी सुरू केली आहे. काल खंडाळ्यातील सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आले होते. त्यावेळी कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिण मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सातारा लोकसभेवर शिवसेनेचा हक्क असून यावेळेस पुरुषोत्तम जाधव यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मुख्यमंत्री नायगाव येथील कार्यक्रम संपवून परत जाताना हेलिपॅडवर जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व सर्व नेत्यांपुढेच त्यांनी सातारा लोकसभेवर शिवसेनेचा हक्क असून या मतदारसंघातून मी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी असे असेल तर आता सातारा लोकसभेची निवडणूक आपण लढू या, तुम्ही तयारी करा..! असे सांगितले.

त्यामुळे उपस्थित नेत्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. यातून मुख्यमंत्र्यांनी श्री. जाधव यांना सातारा लोकसभेसाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता भाजप व अजितदादा गट राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

(Edited by Amol Sutar)

CM Eknath Shinde, Purushottam Jadhav
Trans Harbour Link Toll : अखेर ठरलं! शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 नव्हे इतका टोल....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com