Satara SP Samir Shaikh sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabh Election 2024 : सातारा पोलिस ॲक्शन मोडवर; साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई : समीर शेख

Samir Shaikh मतदान शांततेत पार पाडण्यासाठी राज्य राखीव पोलिस दल व केंद्रस्तरावरील सीएफएफची मदत घेणार असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

Umesh Bambare-Patil

Satara Police News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस ॲक्शन मोडवर असून, पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला आहे. यासाठी ते तब्बल साडेचार हजार व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहेत. निवडणूक काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी रूट मार्च, कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी अधिक सतर्क राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगून पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणाले, मागील निवडणुकांमध्ये ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत. त्यांचे रेकॉर्ड तपासले जात असून, निवडणूक होण्यापूर्वी जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

तसेच जिल्ह्यातील ज्या व्यक्तींकडे शस्त्र परवाना आहे, त्यांना निवडणुकांआधी शस्त्र जमा करण्याचे आवाहन केलेले आहे. काही ठिकाणी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर आमचे विशेष लक्ष असेल. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रत्येक पोलिंग बूथला पोलिसांचे संख्याबळ दिले जाणार आहे.

राज्य राखीव बल, सीआरपीएफ, होमगार्डचे संख्याबळ आम्ही बंदोबस्तासाठी उपयोगात आणणार आहे. मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैशांचे वाटप, अमली पदार्थांचे वाटप होत असेल तर त्यावर आम्ही लक्ष ठेऊन कारवाई करणार आहोत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुका काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी रूट मार्च, कोंम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी राज्य राखीव पोलिस दल व केंद्रस्तरावरील सीएफएफची मदत घेणार असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT