Ranjitsinh Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : विरोधकांना बोलू न देता निलंबित करणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात...

Democratic Constitution Defense Day in Vaduj : रणजितसिंह देशमुख ; वडूजमध्ये लोकशाही संविधान बचाव दिन, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याची गरज...

Amol Sutar

Satara Political News : संसदेत विरोधकांना बोलू न देता त्यांचे निलंबित करणे, हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख यांनी केंद्र सरकारवर केली. वडूज येथे लोकशाही संविधान बचाव दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. तर देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

संसदेतील घुसखोरीच्या घटनेवर सरकारकडून संसदेत (Parliament) निवेदन करण्याची मागणी विरोधक करीत असताना त्यांना बोलू न देता निलंबित करणे हे कृत्य लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. देशाचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या आजच्या युवा पिढीने ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Congress) सदस्य रणजितसिंह देशमुख (Ranjitsinh Deshmukh) यांनी येथे केले.

सातारा जिल्ह्यातील वडूज (Vaduj) येथे खटाव तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने येथील फिनिक्स सभागृहात लोकशाही संविधान बचाव दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, देशातील सर्वसामान्य घरातील मुलांना बेरोजगारीने हतबल केले आहे. देशातील बेरोजगारीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही मुले संसद भवनात गेल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर विरोधी पक्षांनी चर्चा घडवून आणण्याची मागणी लावून धरल्याने त्यावरील चर्चेला केवळ बगल देण्यासाठीच विरोधी खासदारांचे निलंबन करण्यात आले. देशातील लोकशाही धोक्यात आली असून ती जिवंत ठेवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तर प्रदेश प्रतिनिधी राजूभाई मुलाणी यांनी काँग्रेस खासदारांवर निलंबनाची कारवाई करून लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारचा जाहीर निषेध केला.

माण विधानसभा अध्यक्ष डॉ. महेश गुरव म्हणाले, संसद अधिवेशन काळात सत्ताधारी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. भारतीय घटना व संविधानाच्या अक्षरशः चिंधड्या उडवण्याचे काम सुरू आहे. लोकशाहीची हत्या करीत हुकूमशाही पद्धतीने कॉंग्रेससह विरोधी पक्षाच्या दीडशे खासदारांचे निलंबन केले आहे. ही बाब निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT