Satara ZP News: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने आपला करिष्मा दाखवला आहे. 12 पैकी तब्बल 8 जिल्हा परिषदमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता असताना त्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच भाजप स्थापन करण्याची शक्यता होती. 27 जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांच्या विरोधात वापरलेल्या भाषेमुळे त्यांना सत्तेबाहेर राहण्याची वेळ येऊ शकते.
गोरेंनी राष्ट्रवादीसह शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट केले होते. आता त्याचाच बदला घेण्यासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना देखील सज्ज झाली आहे. भाजपला राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. हेच ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली करत असल्याचे दिसत आहे.
हॉटेल फर्नमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांची औपचारिक बैठक पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार भाजपला कात्रजचा घाट दाखवत सत्तास्थापनेबाबत त्यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये 65 जागा आहेत. भाजपला 27 जागा तर, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. भाजपला बहुमतासाठी सहा सदस्यांच्या पाठींब्याची गरज आहे. तर, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर सहज सत्ता स्थापन करू शकतात.
भाजप सत्तेच्या जवळ आहे मात्र स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंशी युतीबाबत बोलणी करण्या येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेला उपाध्यक्ष पद तसेच काही समितींचे अध्यक्षपद देत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्याची भाजपची रणनीती आहे. तर, भाजपशी बोलणी सुरू झाली तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबात मागे न हटता आग्रही राहावे, असा सूर शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.