Satara ZP  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Chairman Election : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडणुकीतही पोलिसांची आठमुडी भूमिका; पत्रकारांना रोखले; 'त्या' निर्णयाने भाजपचा मार्ग मोकळा

Satara ZP BJP vs NCP Shiv Sena Boycott : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या वेळी मोठे नाट्य पाहण्यास मिळाले. राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहातून वाॅक आऊट केले.

Roshan More

Satara ZP News : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मोठे नाट्य पाहण्यास मिळाले होते. पोलिसांनी मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की केली होती. या विषयी त्यांनी विधीमंडळात उडवला होता. त्यानंतर सातारा पोलिस आयुक्त हे सुट्टीवर गेले आहेत. दरम्यान, आज झालेल्या सभापती निवडणुकीत देखील मोठा ट्विस्ट पाहण्यास मिळाला.

राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेने सदस्यांनी भाजपने या आधी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी बेकायदेशीर असल्याचे कारण देत मतदानावर बहिष्कार टाकला. तसेच निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने होत नसल्याने आरोप करत बहिष्काराचे समर्थन केले.

सभापती निवडीच्या दरम्यान सभागृहातून शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांचा वॉक आऊट केले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्व सदस्य पडले सभागृहातून बाहेर. तसेच सातारा जिल्हा परिषद च्या पायऱ्यांवर बसून दोन्ही पक्षाच्या सदस्यांची जोरदार घोषणाबाजी केली.

पोलिसांचा आडमुठेपणा

अध्यक्षपदाच्या निवडीवेळी पोलिसांच्या भूमिकेवर प्रशचिन्ह उपस्थित केले गेले होते. त्यानंतर देखील त्यांनी सभापती निवडीच्या वेळी आडमुठेपणा कायम ठेवला. वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांना जिल्हा परिषदेच्या इमारती पर्यंत देखील पोलिसांनी जाऊ दिले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT