

Satara, 26 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत जिल्हा पोलिसांची भूमिका वादात सापडली आहे. जिल्हा परिषदेच्या परिसरात मंत्री शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की, राष्ट्रवादीच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांना मतदान करू न देता अटक करणे, या गोष्टीमुळे जिल्हा पोलिस टीकचे धनी बनले आहे. मात्र, सातारा न्यायालयाने जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवेळी झालेली घडामोडीप्रकरणी ‘शो कॉज’ नोटीस पाठविली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या मतदानावेळी सभागृहाच्या गेटवर गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदान करू न देताच अटक करण्यात आली होती. त्यांना सातारा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आम्हाला सातारा न्यायालयाने (Satara Court) जामीन मंजूर केला आहे. या वेळी न्यायालयाने त्यांना मारहाण झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे मत नोंदवत तपासी अधिकारी अरुण देवकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या संदर्भात आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करत पोलिसांवर गुन्हा दाखल करणार आहोत, असेही मांडवे आणि देसाई यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आतापर्यंतच्या निवडणुकांवेळी माध्यमांना सभागृहापर्यंत जाऊ दिले जायचे. मात्र, या निवडणुकीत माध्यमांना गेटवर रोखून धरत, धक्काबुक्की व इतर गोष्टींचे चित्रीकरण येऊ नये, याचे नियोजन पोलिसांनी अगोदरच केले होते. येत्या ४ एप्रिल रोजी होणाऱ्या सभापती निवडींमध्ये माध्यमांना मतदानापर्यंत येऊ दिल्यास पारदर्शकता दिसून येईल. तसेच, आम्ही या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही फुटेजही मिळावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
झेडपी निवडणुकीत पोलिसांना लोकशाहीची हत्या केली आहे. जिल्हा परिषछ सदस्य बापू शिंदे यांचा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतला नाही, त्यामुळे पोलिस किती एकाधिकारशाहीने वागले आहेत, हे दिसून येते. आम्हाला नेत असताना मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई हे आडवे आले होते. मात्र, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. मकरंद आबांना १० ते १५ पोलिसांंनी गराडा घालून अडविले होते. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये मंत्री देसाई यांना धाप लागली होती, असेही मांडवे आणि देसाई यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.