Jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : सातारा झेडपीत भाजपचा अध्यक्ष होताच गोरे म्हणाले, ‘निकालानंतर काहींना अहंम होता, आमची चेष्टा लावली होती...’

Jaykumar Gore Reply To Shambhuraj Desai : जयकुमार गोरे यांनी भाजपकडे 28 सदस्यांचे बहुमत असल्याने अध्यक्षपदावर हक्क असल्याचे सांगितले. महायुती एकत्र राहावी असेही त्यांनी स्पष्ट करत जिल्ह्यातील वादावर प्रतिक्रिया दिली.

Vijaykumar Dudhale

Satara, 20 March : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २७ जागा मिळविल्या होत्या, सोबतच एका अपक्षाचा आम्हाला पाठिंबा होता, त्यामुळे आमच्याकडे सर्वाधिक २८ सदस्यांचे संख्याबळ होतं. त्यामुळे सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हा अधिकार होता, त्यामुळे महायुती म्हणून सर्वांनी एकत्र यावं, अशी आमची भावना होती. पण जिल्हा परिषद निकालानंतर अहंम होता, काही लोकांनी आमची चेष्टा लावली होती. पण मला आधीचं काय बोलायचं नाही. हा जिल्हास्तरावरील विषय आहे, राज्यात आमची महायुती आहे आणि आम्ही सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. भाजपचे अपक्षासह २८ संख्याबळ असताना प्रत्यक्षात मतदानावेळी त्यांच्या बाजूने ३३ मते पडली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांना ३० मते मिळाली.

जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, जिल्हा परिषद निवडणूक चालू असताना मंत्र्यांंकडून पोलिसांना, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली. हे कुठल्या न्याय व्यवस्थेत बसते. संपूर्ण व्यवस्थेला कोण वेठीस धरतं, हे बोलण्याची वेळ येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. लहान लहान मुलांना माहिती आहे की कोण कोणाला वेठीस धरतं. यावर मी बोलणार नाही. पण योग्य वेळ आल्यावर तेही होईल.

प्रशासन आणि पोलिसांनी त्यांचे काम केले आहे. जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचा, मुलगा राष्ट्रवादीचा, कंप्लेंट कोणी केली. त्यांचा अंतर्गत विषय होता. त्यात आमचा काय संबंध. त्या गोष्टीशी आमचा कुठेही संबंध नाही, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

भाजपने सुरुवात केली आहे, त्याचा शेवट राष्ट्रवादी आणि शिवसेना करेल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे, या प्रश्नावर जयकुमार गोरे यांनी ती फार मोठी माणसं आहेत. त्यांच्यावर बोलण्याइतपत मी मोठा नाही. आमच्यावर बोलण्याचा, दूषण देणं हा त्यांचा अधिकार आहे, असे स्पष्ट केले.

कामेश कांबळे किंवा इतर सदस्यांनी स्वतःहून भाजपला मतदान केले आहे. गुन्हा दाखल असताना शेवटी बापू शिंदे यांनी कोणाला मतदान केले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी कुणावर काहीतरी बोलण्याचा हा प्रकार आहे. कांबळे तर शिवेंद्रराजेंचा कार्यकर्ता आहे. त्याला ओढायचे किंवा दम देण्याचा कारण काय?, तो हृदयापासून शिवेंद्रराजेंसोबत आहे.

आमच्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य होते, त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष झाला. कामेश कांबळे यांना दमदाटी करण्याचे कोणतेही कारण नाही आणि सभागृहात तर मी नव्हतोच. पोलिसांनी त्यांचे काम केले आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT