Satara ZP : जयकुमार गोरे, शिवेंद्रराजेंची स्ट्रॅटेजी : सातारा झेडपीतील राष्ट्रवादी-शिवसेनेची 5 मते अशी फोडली

Zilla Parishad President Election : साताऱ्यात 33 विरुद्ध 30 मतांनी भाजपने जिल्हा परिषद जिंकली. जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भूमिकेमुळे भाजपला अतिरिक्त मते मिळून विजय मिळाला.
Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore
Shivendraraje Bhosale-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Satara, 20 March : संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद सत्तासंघर्षात अखेर भाजपने पहिल्यांदाच सत्ता काबीज केली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला धोबीपछाड देत अध्यक्षपदी भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली.

अत्यंत चुरशीने झालेल्या प्रक्रियेत भाजपच्या (BJP) बाजूने 33 सदस्य व शिवसेना राष्ट्रवादीच्या बाजूने 30 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. त्यामुळे केवळ तीन मतांच्या फरकाने भाजपने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला. निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या भाजपला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या करिश्मामुळे ३३ मतं मिळाली आहेत.

भाजपचे 27 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. त्यांना भाजप बंडखोर 1 अपक्षाने पाठिंबा दिला हेाता, त्यामुळे भाजपकडे एकूण 28 मतं होती. राष्ट्रवादीच्या (NCP) दोन जिल्हा परिषद सदस्यांना अटक झाली, त्यामुळे 63 सदस्यांनुसार बहुमताचा आकडा 32 झाला. प्रत्यक्षात भाजपने यापेक्षा एक मत जास्त म्हणजे 33 मिळवली आहेत. म्हणजे भाजपने एकूण 5 मतं फोडल्याचे स्पष्ट होते.

झेडपी निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळावर सत्ता मिळविण्याचा निर्धार करत शिवसेनेला बाजूला ठेवत निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काही तालुक्यात एकत्र येत निवडणूक लढवली होती. प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore
Satara ZP President : साताऱ्यात राष्ट्रवादीचा गेम : भाजपने ऐनवेळी हुकमी एक्का बाहेर काढला; पळवापळवी अन्‌ केसेस, 24 तासांत बरंच काही घडलं...

जिल्हा परिषदेच्या ६५ गटांपैकी भाजपला २७ जागा मिळाल्या तर, राष्ट्रवादी काँग्रेसला २०, शिवसेनेला १५, काँग्रेसला एक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक, अपक्षाला एका जागा मिळाली होती. जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३३ जागांची आवश्यकता असताना भाजपचे संख्याबळ नसून देखील भाजपने राष्ट्रवादी शिवसेनेचे मनसुबे उधळून लावत सत्ता स्थापन केली.

दरम्यान, या प्रक्रियेत सकाळी आठपासून जिल्हा परिषदेच्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. साडेअकरा वाजता भाजपचे सदस्य घेऊन ट्रॅव्हल्स दाखल झाली आहे. त्यानंतर सव्वा बाराच्या सुमारास शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य एकत्रित आले.

Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore
Satara ZP : मोठी बातमी : सातारा जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष; जयकुमार गोरे-शिवेंद्रराजेंनी शेवटच्या क्षणी गेम फिरवला, राष्ट्रवादीचे सदस्य फुटले

मतदान प्रक्रियेस प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर 33 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला, तर 30 सदस्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे जिल्हा परिषदेत तीन मतांच्या फरकाने भाजपचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com