Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Loksabha Election 2024 : '...त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमचा उमेदवार निवडून येणार'; सतेज पाटलांचा दावा!

Satej Patil News : सांगलीबाबत वरिष्ठ पातळीकडून आम्ही अजूनही आशावादी, असंही सतेज पाटील म्हणाले.

Rahul Gadkar

Kolhapur Political News : लोकसभा निवडणुकीला अवेघ काही दिवस शिल्लक राहिले असताना, राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे, तर राज्यातील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मतदारसंघांच्या निकालाबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी जाहीर केली आहे.

तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिकांना उमेदवारी दिली गेली आहे. दोन्ही बाजूकडून प्रचार सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील एकूणच राजकीय परिस्थिती आणि महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार सतेज पाटील(Satej Patil) महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार असणाऱ्या शाहू महाराजांच्या प्रचाराबाबत म्हणाले की, 'ऑलरेडी आमचा प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. कोल्हापूरच्या जनतेमध्ये कोल्हापूरच्या मातीतील छत्रपतीच व्यक्तिमत्त्व दिल्लीला पाठवायचं असा विचार आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमची सीट निवडून येईल.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर 'सांगलीच्या जागेचे पडसाद कोल्हापूरमध्ये नाहीत. कोल्हापूरमध्ये शिवसेना ताकदीने काम करत आहे. उद्धव ठाकरेदेखील शाहू महाराजांकडे येऊन गेले आहेत. मधल्या काळात भाजपच्या माध्यमातून काही अफवा पसरवल्या गेल्या. सांगलीबाबत वरिष्ठ पातळीकडून आम्ही अजूनही आशावादी आहोत. तसेच पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे, त्यांनी निर्णय घेतला आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे काँग्रेस म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहे,' असंही सतेज पाटील यांनी सांगली मतदारसंघाबाबत म्हटलं.

याचबरोबर आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर 'वैयक्तिक टीका दोन्हीकडून होणे अपेक्षित नाही. आम्ही आमच्या पातळीवर सूचना दिल्या आहेत. शाहू महाराजांना लोकसभेत पाठवावं यासाठी लोक आसूसलेले आहेत. शाहू महाराजांच्या संदर्भात चुकीचे मेसेजेस तिकडून येण्यास सुरुवात झाली, यामुळे मी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. मी स्वतः तीन दिवसांपूर्वी ही तक्रार दिली आहे. ही कोल्हापूरच्या अस्मितेची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची लढाई आहे. मान गादीला मत गादीला असं कॅम्पेनिंग आमचं सुरू झालेलं आहे,' अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी सांगितलं.

याशिवाय राजू शेट्टींबाबत(Raju Shetty) सतेज पाटील म्हणाले, 'शिवसेनेने अद्याप हातकणंगलेची जागा घोषित केलेली नाही. हातकणंगले संदर्भात वरिष्ठ पातळीवर अद्यापदेखील चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा केली, सर्वांचे मत आपण राजू शेट्टींच्या बाजूने राहावे असे आहे. वंचितने तेथे उमेदवार दिले असल्याने आज किंवा उद्या याचा निर्णय होईल.'

याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत पृथ्वीराज चव्हाणांच्या भूमिकेवर बोलताना सतेज पाटील यांनी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीला गेली, तर सातारामधून उमेदवार निवडून आणण्यास पृथ्वीराज चव्हाण यांचा महत्त्वाचा वाटा असेल. पुढील आठ दिवसांत काय होईल सांगता येत नाही, असं सचूक विधान केलं.

तसेच पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या रवींद्र धंगेकरांबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले, अशिक्षित शिक्षित हा विषय करण्यापेक्षा कर्तृत्व कोणाचे आहे, याचा प्रत्येकाने विचार करावा. रवींद्र धंगेकर हे पुणेकरांचे उमेदवार आहेत. त्यांचे कर्तृत्व हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आमच्या उमेदवाराची कार्यक्षमता आणि सामान्य माणसातला उमेदवार आपला वाटतो. शिकलेला उमेदवार आपला वाटत नसेल तर दुसऱ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात काही अर्थ नाही.

भाजप नेते अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला उत्तर देतना सतेज पाटील म्हणाले, 'काँग्रेसमध्ये काय राहिले आहे हे सात जूनला महाराष्ट्र बघेल. महाराष्ट्रात काँग्रेस जिवंत आहे आणि ताकदीने उभी आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद काय आहे हे स्पष्टपणे दिसेल. तसेच, इंडिया आघाडी तयार झाल्यापासून नवीन पर्याय मिळाला आहे. इंडिया आघाडीबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. इंडिया आघाडी भाजपला पर्याय होऊ शकतो, असे लोकांना वाटू लागले आहे. महाराष्ट्राचा जनमत भाजपच्या बाजूने नाही हे भाजपला समजले आहे. यामुळे ते महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका घेत आहेत,' अशा शब्दांत सतेज पाटील यांनी टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT