Lok Sabha Election 2024 : "महाराजांचे स्थान अबाधित ठेवायचं असेल, तर...", मुश्रीफांनी MVA च्या कार्यकर्त्यांना सुनावलं

Hasan Mushrif On Sanjay Mandlik : "मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावे वेगवेगळी होऊच शकत नाहीत," असंही मुश्रीफांनी म्हटलं.
shahu maharaj hasan mushrif
shahu maharaj hasan mushrifsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) प्रचारादरम्यान कोणावरही टीकाटिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. शाहू महाराज छत्रपती यांना आम्ही आदर स्थानी मानलेले आहे. आम्ही महाराजांना विनंती केली होती, या वयामध्ये आपण निवडणूक लढवू नये. कारण, निवडणुकीची प्रचाराची पातळी कशी घसरत जाईल हे आज आम्हाला माहिती नाही. खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांच्याबाबत विरोधकांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. असा प्रचार व्हायला लागला आणि आमच्या बाजूने काहीतरी टीका झाली तर आदराचे स्थान कुठे जाईल? त्यामुळे हे वेळीच रोखणे गरजेचं आहे. महाराजांचे स्थान अबाधित ठेवायचे असेल, तर अशी टीका टाळावी, अशा शब्दांत पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.

"संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांना खासदार करून कागल तालुक्याचा सन्मान आणि स्वाभिमान जपूया. त्यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयाच्या रूपाने कै. सदाशिवराव मंडलिक यांना वंदन करूया," असे आवाहन हसन मुश्रीफ( Hasan Mushrif ) यांनी केले. येथील शाहू हॉलमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुश्रीफ म्हणाले, "कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघाचे मताधिक्य हे मंडलिक यांना विजयाप्रत नेणारे ठरेल. नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) पंतप्रधान झाल्यानंतर देशाने प्रगती केली आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मंडलिकांना विजयी करायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी हेवेदावे सोडून एकदिलाने काम करावे." या वेळी मुश्रीफ यांनी शेरोशायरीही केली.

shahu maharaj hasan mushrif
Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत मत विभाजन अटळ, चौरंगी लढतीत महायुतीला बळ

मंडलिकांनी म्हटलं, "कागल तालुक्यात विकासाचे राजकारण करण्यासाठी स्पर्धा असते. पालकमंत्री मुश्रीफांसह खासदार धनंजय महाडिक आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांनी माझ्या उमेदवारासाठी प्रयत्न केले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पालकमंत्री मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे व मी विकासासाठी एकत्र आलो आहोत."

मंडलिक- मुश्रीफ एकच!

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, "मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावे वेगवेगळी होऊच शकत नाहीत. आम्ही अनेक वर्षे एकत्र काढली आहेत. दुर्दैवाने काही मतभेदही झाले; परंतु मनातील आत्मीयता आणि जिव्हाळा कधीच कमी झाला नाही."

( Edited By : Akshay Sabale )

R

shahu maharaj hasan mushrif
Sangli Lok Sabha Election 2024 : सांगलीत विरोधकांचे ठरेना, भाजपमध्ये जमेना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com