Satej Patil News .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil News: 24 तासांच्या आतच सतेज पाटलांनी घेतला मुश्रीफांचा बदला, करवीरमधून 'गोकुळ'चा मोहरा उचलला

Gokul Politics: करवीर तालुक्यातून दिवंगत गोकुळचे संचालक सुरेश पाटील यांचे चिरंजीव माजी संचालक सत्यजित पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सत्यजित पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे गोकुळ दूध संघाच्या राजकारणात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना धक्का बसला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: गोकुळ दूध संघ निवडणूकीनिमित्त जिल्ह्यातील राजकीय चक्रे अगदी गतिमान फिरत आहेत. अशातच अर्ज माघारीच्या अंतिम क्षणापर्यंत उमेदवारांसह ठराव पळवापळवीचे राजकारण सुरू झाले आहे.

अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या बाजूने असणारे जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील यांना आपलं केलं. याला 24 तास उलटत नसताना आमदार पाटील यांनी मंत्री मुश्रीफांना झटका दिला आहे.

करवीर तालुक्यातून दिवंगत गोकुळचे संचालक सुरेश पाटील यांचे चिरंजीव माजी संचालक सत्यजित पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सत्यजित पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे गोकुळ दूध संघाच्या राजकारणात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना धक्का बसला आहे. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

या दरम्यान सतेज पाटील यांनी आगामी राजकारणाबाबत धक्कादायक दावे केले आहेत. ठरावदारांसह सर्वसामान्य लोकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गोकुळनिमित्ताने जरी फिरत असलो तरी ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची पेरणी करत आहे. गोकुळसह जिल्हा बँक आणि पदवीधरची निवडणूक ताकदीने लढावी लागणार आहे. असं कार्यकर्त्यांना आवाहन करत महायुतीच्या नेत्यांविरोधात शड्डू ठोकला आहे.

दिवंगत नेते श्रीपतराव बोंद्रे आणि दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्या विचाराची काँग्रेस जिल्ह्यात रुजवण्यासाठी आणि तोच वारसा पुढे नेण्यासाठी आज गोकुळचे माजी संचालक सुरेश पाटील यांचे चिरंजीव सत्यजीत पाटील आपल्या सोबत आले असल्याने निश्‍चितपणे आनंद असल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी आज व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस राहुल पाटील यांच्या गटाचे कार्यकर्ते आणि सत्यजीत पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार सतेज पाटील म्हणाले, विधानसभा व लोकसभा निवडणूकीत कोल्हापूर जिल्ह्यात साडे दहा ते अकरा लोकांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मते दिली आहेत. त्यामुळे या लाखो लोकांना काँग्रेसची विचारधारा मान्य आहे. भविष्यात काँग्रेसला मोठे यश मिळणार आहे.

सत्यजीत पाटील म्हणाले, आमची विचारधारा काँग्रेसची आहे. त्यामुळे, कोणत्याही नियम व अटी न लागू करता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी, राजू लाटकर, इंद्रजीत बोंद्रे, एकनाथ पाटील उपस्थित होते.

गोकुळ दूध संघाच्या मागील निवडणुकीत शाहूवाडी चे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी महाडिक गटाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, सत्यजित सरूडकर यांनी महायुतीला धक्का देत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT