MLC Election : नागपूर पदवीधरसाठी काँग्रेसकडून एक नाव फायनल : भाजपमध्ये तिघांची चर्चा; गडकरींच्या बंगल्यावर ठरला ‘धक्कातंत्रा’चा प्लॅन?

MLC Election : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. भाजपमध्ये मात्र सुधाकर कोहळे, अनिल सोले आणि सुधीर दिवे यांच्या नावांवर चर्चा सुरू आहे.
MLC Election 2026
MLC Election 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांना पुन्हा मैदानात उतरवण्याची तयारी जवळपास निश्चित केली आहे. त्याचवेळी भाजपमध्ये मात्र उमेदवाराच्या नावावर अद्याप सस्पेन्स कायम आहे. भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे, अनिल सोले आणि मतदार नोंदणी उपप्रमुख सुधीर दिवे सुधीर दिवे या तीन नावांची चर्चा आहे.

रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात झालेल्या बैठकीत या तिन्ही नावांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहरातील भाजप आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून संभाव्य उमेदवारांबाबत त्यांची मते जाणून घेतली.

नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र 2020 मध्ये काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा 18,910 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे गमावलेली जागा पुन्हा मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

MLC Election 2026
MLC Election : पुणे शिक्षक, पदवीधरमध्ये बंडखोरीचे सावट; कारभाऱ्यांनी शड्डू ठोकला : एकनाथ शिंदे, मुश्रीफांवर धर्मसंकट?

भाजपमध्ये तीन नावांची चर्चा

भाजपकडून मतदार नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे, माजी आमदार अनिल सोले आणि मतदार नोंदणी उपप्रमुख सुधीर दिवे यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, यापैकी नेमका कोणता चेहरा निवडणुकीच्या मैदानात उतरवला जाणार, याबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजप यावेळी चर्चेत असलेल्या नावांपैकीच उमेदवार देणार की पक्षाच्या नेहमीच्या निर्णयपद्धतीप्रमाणे अचानक वेगळ्या चेहऱ्याला संधी देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

MLC Election 2026
Vidhanparishad Election : विधानपरिषदेसाठी शरद पवारांचा 'मास्टरप्लॅन' रेडी! 'सिल्व्हर ओक'वर संभाव्य उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?

गडकरींच्या बंगल्यावर खलबतं; ‘धक्कातंत्रा’ची चर्चा

नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपसाठी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ राहिला आहे. 1978 पासून 2020 पर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात जनसंघ आणि भाजपचे वर्चस्व होते. मात्र, 2020 मध्ये अभिजित वंजारी यांच्या विजयामुळे हे समीकरण बदलले. त्यामुळे यंदाची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

काँग्रेसकडून वंजारींचे नाव पुढे

दुसरीकडे काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांचे नाव फायनल असल्याची माहिती आहे. त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत पातळीवर हिरवा कंदील मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उमेदवाराबाबतचे चित्र भाजपच्या तुलनेत अधिक स्पष्ट असल्याचे दिसत आहे. आता ६ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत भाजप कोणता चेहरा पुढे करते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com