PMC Job Scam: पुणे महापालिका भरती घोटाळ्यात मोठा मासा गळाला : जेजुरी देवस्थानचा माजी विश्वस्त गजाआड

Pune News: डॉ. राजेंद्र खेडेकर हा महापालिका भरती गैरव्यवहार प्रकरणात मुख्य संशयित आरोपींपैकी एक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मार्च २०२२ ते जुलै २०२६ या कालावधीत महापालिकेतील विविध जागांवर नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढले.
PMC Recruitment fraud .jpg
PMC Recruitment fraud .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

अनिल सावळे

Pune News : पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर याला शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. २९) अटक केली. खेडेकर हा जेजुरी देवस्थानचा माजी विश्वस्त असून, या प्रकरणात यापूर्वी सात आरोपींना अटक केली आहे.

डॉ. राजेंद्र खेडेकर हा पुणे महानगरपालिका भरती गैरव्यवहार प्रकरणात मुख्य संशयित आरोपींपैकी एक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मार्च २०२२ ते जुलै २०२६ या कालावधीत महापालिकेतील विविध जागांवर नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढले.

खोटे शिक्के, बनावट नियुक्तिपत्रे आणि अधिकृत भासणारी कागदपत्रे तयार करून या तरुणांकडून कोट्यवधी रुपयांची रोकड उकळल्याचा संशय आहे. याप्रकरणी १९ जुलै रोजी राजेंद्र खेडेकर आणि महापालिकेच्या शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांसह आठजणांविरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात अटक टाळण्यासाठी खेडेकरने पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून, यामागे मोठे रॅकेट असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने खेडेकरचा जामीन अर्ज फेटाळला होता.

PMC Recruitment fraud .jpg
PMC News: पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? 'लाडक्या' ठेकेदारासाठी आयुक्तांना दिलेली धमकी आमदाराला भोवणार?

पुणे महानगरपालिका भरती गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपींपैकी एक असलेल्या राजेंद्र खेडेकर हा जेजुरी देवस्थान विश्वस्तपदी कार्यरत होता. परंतु, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर, जेजुरी देवस्थानने खेडेकरला विश्वस्त पदावरून बाजूला केले होते.

राजेंद्र खेडेकरला पोलिस कोठडी

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी राजेंद्र खेडेकर याला मंगळवारी न्यायालयात हजर केले. त्यावर न्यायालयाने राजेंद्र खेडेकर याला तीन ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com