Solapur Dcc Bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Cader Election : माजी संचालकांच्या ‘कॅडर’च्या वाटेतही कलम 88 चा स्पीड ब्रेकर; 16 जागांसाठी 109 अर्ज दाखल, छाननीकडे लक्ष

Solapur News : सोलापूर डीसीसी बँकेच्या माजी संचालकांवरील सहकार कायद्याच्या कलम 88 अंतर्गत झालेली कारवाई आता जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या निवडणुकीतही अडथळा ठरू शकते. उमेदवारी अर्जांच्या छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रमोद बोडके

Solapur, 19 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी संचालकांचे अर्ज अपात्र होण्यास सहकार कायदा कलम ८८ अन्वये झालेली कारवाई महत्वाचे कारण ठरले आहे. सोलापूर जिल्हा देखरेख (कॅडर) सहकारी संस्थेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या डीसीसीच्या माजी संचालकांना निवडणूक लढण्यासाठी पुन्हा एकदा हेच कारण प्रमुख अडथळा ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॅडरसाठी अर्ज दाखल करण्याचा आज (ता. १९ नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता, त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गर्दी झाली होती. कॅडरच्या १६ जागांसाठी एकूण १०२ जणांचे १०९ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी उद्या (शुक्रवारी, ता. 20 नोव्हेंबर) सकाळी 11 पासून जिल्हा बँकेच्या सभागृहात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांच्या समोर ही छाननी होणार आहे.

जिल्हा बँकेचे माजी संचालक जयवंतराव जगताप, संजयमामा शिंदे, दिलीप माने, बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे या माजी संचालकांनी कॅडरच्या संचालकपदासाठीही अर्ज दाखल केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या माजी संचालकांचा उमेदवारी अर्ज कलम 88 व कलम 110 अ च्या कारवाईमुळे अपात्र झाला होता. आता कॅडरच्या छाननीत माजी संचालकांच्या अर्जांचे काय होणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोसायटी मतदारसंघातील उमेदवार : ११ जागा

अक्कलकोट : शिवानंद पाटील, मिलन कल्याणशेट्टी

बार्शी : रणवीर राऊत

करमाळा : जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, सुभाष गुळवे, बबन मेहेर

माळशिरस : संग्रामसिंह जहागिरदार, धैर्यशील मोहिते-पाटील, सुरेश पाटील, मनोज शेळके, किरण शिंदे

माढा : सतीश केचे, रणजित शिंदे, संजयमामा शिंदे, सुरेश पाटील, प्रतापसिंह पाटील, ज्ञानदेव टोणपे

मंगळवेढा : सिध्देश्‍वर आवताडे, बबन आवताडे, सुशील आवताडे

मोहोळ : मदन पाटील

पंढरपूर : प्रणव परिचारक

सांगोला : पोपट गडदे, भाऊसाहेब खटकाळे, विजय येलपले, सुभाष पाटील, सोमनाथ गोडसे, संतोष देवकते, दादासाहेब बाबर, विजय पवार, संतोष पवार

उत्तर सोलापूर : दिलीप माने, चंद्रकांत म्हेत्रे, तुकाराम गुंड, सिध्दाराम चाकोते

दक्षिण सोलापूर : सुरेश हसापुरे, श्रीदिप हसापुरे, नागप्पा बनसोडे, इंदुमती अलगोंड

महिला मतदारसंघ : २ जागा (१७ उमेदवार)

सवितादेवी राजेभोसले, इंदुमती अलगोंड, प्रियांका भगत, मनीषा रणे, माधुरी मोरे, महादेवी कोगनूर, पल्लवी घोडके, भारती भोंग, सविता गायकवाड, रोहिणी मोरे, अश्‍विनी बादल, सुवर्णा दळवे, सुवर्णा शिंदे, अर्चना शिंदे, सुनिता खुने, विणा जोकारे, सुप्रिया सुरवसे.

---

अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ : १ जागा (९ उमेदवार)

नानासाहेब नाईकनवरे, नागनाथ रणशूर, लक्ष्मण धनवडे, विशाल जाधव, येदा दुपारगुडे, वैशाली कापुरे, हरिश्‍चंद्र साळवे, तानाजी गायकवाड, संदीप ठाकर.

भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदारसंघ : १ जागा (१७ उमेदवार)

दादासाहेब शिंगाडे, महेंद्र खटके, पोपट गडदे, नागप्पा बनसोडे, हनुमंत पाटील, प्रथमेश पाटील, सतिश सोनटकले, भाग्यवंत तरंगे, मोतीराम राठोड, तानाजी वाघमोडे, हणमंत मासाळ, संतोष देवकते, अशोक येडगे, बिरमल कोळी, हणमंतराव बुरले, बनसिध्द बने, भाऊसाहेब बुधवंत.

इतर मागासवर्गीय मतदारसंघ : १ जागा (१९ उमेदवार)

देवीदास ढोपे, सिध्देश्‍वर आवताडे, वैभव कुटे, गोपाळ शेळके, शिवानंद पाटील, यशवंत धोंगडे, विजयकुमार माळी, जमीर सुतार, काशिनाथ गौडगुंडे, महेश सगरे, सुजीत बागल, सुभाष गुळवे, रामचंद्र बनकर, नागनाथ झुंजारे, विनोद माने, अविनाश मार्तंडे, श्रीदिप हसापुरे, सुरेश हसापुरे, बबन मेहेर.

चार जागा बिनविरोध

पंढरपूरमधून प्रणव परिचारक, मोहोळमधून मदन पाटील आणि बार्शीतून रणवीर राऊत यांचे एकमेव अर्ज आहेत. मंगळवेढ्यातून आवताडे यांच्या घरातीलच तीन उमेदवार आहेत. कॅडरच्या १६ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या असून या निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे. उद्या (शुक्रवारी, ता. २० नोव्हेंबर) छाननी झाल्यानंतर अर्ज माघारीसाठी २३ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत मुदत देण्यात आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT