Solapur Dcc Bank : जयकुमार गोरेंचा दिलीप मानेंना टोला : ‘मालक, आता तरी मुलाला पुढे येऊ द्या...’

Jaykumar Gore News : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा बँकेच्या माजी संचालकांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे सूचित करत टोला लगावला. बँकेत आता नव्या पिढीचे नेतृत्व सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
jaykumar gore-Dilip Mane-prithviraj   mane
jaykumar gore-Dilip Mane-prithviraj maneSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 19 November : काही माजी संचालकांना पुन्हा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत येण्याची इच्छा होती; परंतु जे सिध्दरामेश्‍वरांच्या मनात आहे, तेच होते. कारण कोणीही असू दे, जे प्रारब्धात आहे ते कोणीही बदलू शकत नाही. आता आदेश दिलेला आहे. माजी संचालकांचे काम संपले आहे. नव्या पिढीचे, मुलांचे काम सुरू झाले आहे. माजी संचालकांना बँकेपुरती का होईना रिटारमेंट घ्यावी लागेल, असे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चिमटे काढले अन्‌ कोपरखळ्या आज मारल्या.

भाजप समविचारी आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ सिध्देश्‍वर मंदिर परिसरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले, जिल्हा बँकेत ज्या चुका पूर्वी झाल्या आहेत, त्या होणार नाहीत, त्या चुका करणारे पुन्हा जिल्हा बँकेत येऊ नयेत, अशीच शेतकऱ्यांची भूमिका होती. जिल्हा बँकेला ज्यांच्यामुळे डाग लागला, ती माणसं फिरुन सांगू लागली की आमची बँक आहे. काही नेते बिनविरोधची भाषा बोलत असले तरीही प्रत्यक्षात निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी आतून सुरू केली होती.

जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यांत क्रॉस मतदान होऊ नये. कोणीही कोणाची गंमत करण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी परस्परांवर विश्वास ठेवून आपल्या प्रतिष्ठेला साजेसे असे मताधिक्य मिळवून द्यावे, असे आवाहन गोरे यांनी केले.

jaykumar gore-Dilip Mane-prithviraj   mane
Satara Politic's : अजितदादांनी उंडाळकरांना दिलेला शब्द मकरंदआबांनी पूर्ण केला...

या वेळी गोरे यांनी शाब्दीक टोलेबाजी करताना माजी संचालकांना जोरदार चिमटे काढले. माजी संचालकांना, नाईलाजाने का होईना बँकेपुरती तरी रिटारमेंट घ्यावी लागली. सत्कारासाठी संचालकांची नावे पुकारण्यात आली. त्यावेळी ते अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यात पृथ्वीराज दिलीप माने हे असल्याचे लक्षात येताच, ‘मालक, आता तरी मुलाला पुढे येऊ द्या,’ असा टोला गोरेंनी माजी आमदार दिलीप माने यांना लगावला. त्यावर एकच हशा पिकला.

jaykumar gore-Dilip Mane-prithviraj   mane
Rajan Patil : राजन पाटील ठरले ‘धुरंधर’; सोलापूर Dccत एकाचवेळी दोन्ही चिरंजीवांची बिनविरोध एन्ट्री, मोहिते पाटलांनंतर साधली किमया...

हसापुरे, तुमचा मुलगाही तुमच्यासारखाच...

तत्पूर्वी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सुरेश हसापुरे यांना शालजोडे लगावले. श्रीदीप सुरेश हसापुरे यांचेही नाव सत्कारासाठी घेण्यात आले, त्यावेळी तेही अनुपस्थित होते. त्यावेळी हसापुरे, तुमचा मुलगा तुमच्यासारखाच आहे. अचानक कुठेतरी जातो, असे परिचारक म्हणताच हसापुरेंसह व्यासपीठावर मंडळीही हासू लागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories