Eknath Shinde Pandharpur Tour : कलेक्टर, एसपींचा सल्ला अन्‌ आमदार राजू खरेंची विनंती; एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने पुण्याला जाण्याचा निर्णय

Helicopter Failure News : कार्तिकी यात्रेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर पंढरपुरात नादुरुस्त झाले. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pandharpur, 19 November : कार्तिकी यात्रेच्या तयारीच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (ता. 19 नोव्हेंबर) पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. ठाण्याहून हेलिकॉप्टरने शिंदे हे पंढरपुरात आले होते. पंढरपुरात त्यांनी वारीच्या तयारीची पाहणी केल्यानंतर ते परत ठाण्याला जाण्यासाठी हेलिपॅडवर आले. मात्र, अनेकदा प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर सुरू झाले नाही, हेलिकॉप्टर नादुरुस्त झाल्यामुळे त्यांनी शिंदेंना हेलिकॉप्टरने प्रवास न करण्याचा सल्ला दिला. तसेच, आमदार राजू खरे आणि शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना मोटारीने पुण्याला जाण्याची विनंती केली. त्यानंतर शिंदे यांनी मोटारीने पुण्याला जाणे पसंत केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता. 19 नोव्हेंबर) कार्तिकी यात्रेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी सकाळी ठाण्याहून पंढरपूरला हेलिकॉप्टरने आले होते. दिवसभर पाहणी केल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास हेलिकॉप्टरने ठाण्याकडे जाण्यासाठी निघाले. त्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. पायलटने हेलिकॉप्टर सुरू करण्यासाठी बराच वेळ प्रयत्न केल्यानंतरही हेलिकॉप्टर सुरू न झाल्याने अखेर एकनाथ शिंदे यांनी मोटारीने पुण्याकडे प्रयाण केले.

एकनाथ शिंदे हे ठाण्याकडे जाण्यासाठी अमन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. पायलटने हेलिकॉप्टर सुरू करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. मात्र, हेलिकॉप्टरची बॅटरी डाउन झाल्याने हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द करण्यात आले.

Eknath Shinde
Solapur Dcc Bank : जयकुमार गोरेंचा दिलीप मानेंना टोला : ‘मालक, आता तरी मुलाला पुढे येऊ द्या...’

यावेळी आमदार राजू खरे आणि इतर शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने पुण्याकडे जावे, अशी विनंती केली. तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयेन, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने हेलिपॅडकडे धाव घेतली.

Eknath Shinde
Satara Politic's : अजितदादांनी उंडाळकरांना दिलेला शब्द मकरंदआबांनी पूर्ण केला...

हेलिकॉप्टर नादुरुस्त झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना हेलिकॉप्टरने प्रवास न करण्याचे सांगितले. त्यानंतर शिंदे यांनीही मोटारीने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला.

पवारांच्या आमदाराने केले एकनाथ शिंदेंचे सारथ्य

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील उपस्थित होते. शिंदे यांनी बुलेटवर बसून पंढरपुरात कार्तिकी वारीच्या तयारीची पाहणी केली. त्यावेळी शिंदे यांच्या गाडीचे सारथ्यही आमदार पाटील यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Eknath Shinde
Eknath Shinde
Eknath Shinde Shivsena
Devendra Fadnavis And Eknath Shinde