Shahu Maharaj- Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha Constituency : महायुतीच्या 45 मधून कोल्हापूरची एक जागा निश्चित कमी होईल; शाहू महाराजांच्या विजयाचे जयंतरावांकडून भाकीत

Jayant Patil prediction : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या संपर्क दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. हा संपर्क दौरा सांगवडे वाडी येथे आला असताना जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 26 March : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी महायुतीच्या मिशन 45 प्लसवर टीका केली आहे. दावा सगळेच राजकीय पक्ष करत असतात. कोल्हापुरात फिरल्यानंतर 45 मधील एक जागा या ठिकाणी कमी झालेली दिसेल. साताऱ्यातही हीच परिस्थिती आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी महायुतीचा 45 प्लसच्या दाव्याची खिल्ली उडवली.

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या संपर्क दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. हा संपर्क दौरा सांगवडे वाडी येथे आला असताना जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महायुतीने 45 प्लसचा नारा दिला आहे. त्यादृष्टीने महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. लोकांचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो. पण, 45 प्लस आहे की नाही, हे महाराष्ट्राला माहीत, असा टोलाही त्यांनी महायुतीला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागावाटपाबाबत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, बऱ्यापैकी सर्वच जागांवर निर्णय झालेला आहे. केवळ दोन ते तीन जागांवर महाविकास आघाडीचा तिढा कायम आहे. मात्र, त्यावर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. दोन ते तीन दिवसांत त्यावर मार्ग निघेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीसोबत आमची चर्चा सुरू आहे. त्यांनी आमच्या सोबत यावे, असे आम्हाला वाटते. यावर काही ना काही निर्णय लवकर होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

रासपचे आमदार महादेव जानकर यांनी यू टर्न घेत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर जयंत पाटील यांनी, माढा लोकसभा मतदारसंघातील जागा आम्ही तुम्हाला देणार आहोत, असा जानकर यांना शरद पवार यांनी उघडपणे सांगितले होते. मात्र, जानकर यांचा वेगळा विचार झालेला आहे. त्यामुळे आम्हाला माढ्यातून उमेदवार शोधावा लागणार आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

कोल्हापुरातून (Kolhapur) शाहू महाराजांनी निवडणुकीत उभे राहावे, यासाठी दोन ते तीन वेळा मी त्यांना भेटलो आहे. त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विनंतीला मान देऊन ते लोकसभेला उभे राहिले आहेत. छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचा सन्मान करवीर नगरीतील लोक करतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

...तर आम्हाला हातकणंगल्यात उमेदवार द्यावा लागेल

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीत येण्यास नकार दिला आहे. ते एकटे लढण्यावर ठाम आहेत. त्यावरही आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जर राजू शेट्टी हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी स्वीकारायला तयार नसतील, तर त्या ठिकाणी आम्हाला उमेदवार द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT