Lok Sabha Election 2024 : शेट्टी ठाम, हातकणंगलेत उमेदवार देण्यासाठी 'मातोश्री'वर हालचाली वाढल्या

Hatkangale Loksabha Election 2024 : ठाकरे गटाकडे असणाऱ्या हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारीबद्दल अनिश्चितता कायम आहे.
raju shetti uddhav thackeray
raju shetti uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) पाठिंबा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांनी दोन वेळा 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली. एकीकडे महाविकास आघाडीनं उमेदवारी देणार नसल्याचं शेट्टींनी बोलून दाखवलं आहे. तरी, 'मातोश्री'वर हातकणंगलेत उमेदवार देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात हातकणंगलेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. शेट्टी ठाम असल्यानं महाविकास आघाडीकडून येथे उमेदवारी देण्यावर निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीमधील काही जागांवरचा घोळ मिटण्याचे नाव घेत नाही. अशातच ठाकरे गटाकडे असणाऱ्या हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारीबद्दल अनिश्चितता कायम आहे. राजू शेट्टींनी ( Raju Shetti ) 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे. ठाकरे गटानं पाठिंबा देण्यासाठी शेट्टींनी 'मातोश्री'वर ठाकरेंची दोन वेळा भेट घेतली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबद्दल शेट्टींची नाराजी आहे. महाविकास आघाडीत थेट न जाता ठाकरे गटानं पाठिंबा द्यावा, अशी शेट्टींची भूमिका आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेट्टी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि शरद पवार यांच्यात सोमवारी ( ता.25 ) हातकणंगले मतदारसंघाबाबत चर्चा झाली. स्वाभिमानी महाविकास आघाडीत येण्यास तयार नसल्यामुळे ठाकरे गटानं उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

raju shetti uddhav thackeray
Loksabha Election 2024 : जातीय समीकरणाचा आणि निष्ठावंतांचा फटका स्वाभिमानीला घातक...

शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिणचेकर व शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह अन्य एका उमेदवाराच्या नावाची चाचपणी ठाकरे गटाकडून झाल्याची माहिती आहे. पुढील तीन दिवसांत ठाकरे गट हातकणंगले मतदारसंघातून उमेदवार निश्चित करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

raju shetti uddhav thackeray
Lok Sabha Election 2024 News : शिराळामध्ये शेट्टींचा बालेकिल्ला मजबूत, पण जयंत पाटलांच्या हाती चावी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com