Aditya Thackeray, Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Aditya Thackeray: शंभूराज देसाईंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरणार; 'मी येतोय'..., आदित्य ठाकरे..

Satara Politics: गद्दारीचा फार मोठा डाग त्याच्यावर आहे.

Vishal Patil

Patan News: राज्यात शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीपासून तालुका, जिल्हा आणि राज्यात शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष पाहायला मिळत आला आहे. शिंदे गटाने घेतलेल्या वेगळ्या होण्याच्या भूमिकेला गद्दारीचा शिक्का मारत ठाकरे गट अनेकदा प्रहार करीत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून बाहेर पडलेले मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात आता ठाकरे गटाकडून व्यूहरचना आखली गेली आहे. हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनापासून 'मी येतोय' पोलखोल करण्यासाठी असा व्हिडिओ टिझर प्रदर्शित झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व गेल्या तीन टर्म पाहायला मिळत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. परंतु, त्यानंतर 2022 मध्ये घडलेल्या शिवसेनेतील फूटीमध्ये शंभूराज देसाई यांची महत्वपूर्ण भूमिका होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे या सातारा जिल्ह्यातील तिघांनी ठाकरेंची साथ सोडली. मंत्री देसाई माध्यमांसमोर असो की सभागृहात ठाकरे गटावर जोरदार प्रहार करताना पाहायला मिळतात. त्यामुळे पाटण विधानसभा मतदार संघात नव्हे तर राज्यात ते नेहमीच चर्चेत असल्याचे पहायला मिळते. मात्र, आता देसाईंच्या मतदार संघातील कारभारावर ठाकरे गट निशाणा साधणार आहे.

ठाकरे अन् शिंदे गट आमनेसामने येणार

सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी याबाबतची माहिती देत एक टिझर प्रदर्शित केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारीपासून पाटण तालुक्यात शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष पुन्हा पाहायला मिळणार आहे. हर्षद कदम यांनी मी येतोय असा ट्रीझर लॉन्च केला आहे. यामध्ये पाटण तालुक्यात ज्या प्रकारचे वातावरण दाखवल जातयं. त्यामध्ये पाटण मतदार संघात उमेदवार नाही, शंभूराज देसाईंना सक्षम पर्याय नाही.

पाटण मतदार संघात खूप विकासकामे झालेली आहेत. या सर्व गोष्टी धादांत खोट्या आहेत. या गोष्टी पुराव्यानिशी लवकरच ठाकरे गटाकडून मांडण्यात आहेत. मंत्र्याकडून पाटणला सुरू असलेला बोगसपणा, कामांचा खोटेपणा, पाटण तालुक्यात एकही धोरणात्मक काम आलेलं नाही. रोजगाराची एकही संधीही निर्माण झालेली नाही. गद्दारीचा फार मोठा डाग त्याच्यावर आहे. त्यांनी राजकीय स्वार्थ कसाकसा साधला हे सर्व मांडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

आदित्य ठाकरेची सभा

येत्या 10 जानेवारी रोजी पाटण तालुक्यातील तळमावले येथे शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी पाटण विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकही पार पडणार आहे. सायंकाळी 4 वाजता सभा होणार आहे. सभेला शिवसेना नेते अनिल देसाई, विनायक राऊत, नितीन बानगुडे- पाटील उपस्थित राहणार आहेत.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT