Maharashtra Prison Department: महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांची भरती; जाणून घ्या पात्रता अन् निकष

Senior Clerk: वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि काही तांत्रिक पदे भरली जाणार
Maharashtra Prison Department
Maharashtra Prison DepartmentSarkarnama
Published on
Updated on

सरकारी नोकरीसंदर्भात विविध विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असाल तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने कारागृह विभागातील गट क पदासाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि काही तांत्रिक पदे भरली जाणार आहेत. कारागृह विभागाच्या या भरतीमध्ये एकूण पदे, त्याची निवड प्रक्रिया आणि निकष याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात...

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वतीने गट क संवर्गातील रिक्त जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 25 पदासांठी तब्बल 255 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना कारागृह विभागाच्या संकेतस्थळावरून (http://mahaprisons.gov.in/) ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 21 जानेवारी 2024 पर्यंत आहे.

Maharashtra Prison Department
Maharashtra Government: आताच अर्ज करा... सरकारी नोकरीची संधी, 670 जागांची बंपर भरती

कशी आहे पात्रता आणि निकष

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वतीने विविध पदासाठी करण्यात येणाऱ्या भरतीमध्ये लिपिक पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. भरतीमध्ये एकूण जागांपैकी 125 लिपिकपदे भरली जाणार आहेत. भरतीमध्ये सुतारकाम, शिवणकाम, प्रयोगशाळा, बेकरी निदेशक अशी विविध तांत्रिक पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भातील शैक्षणिक पात्रता आणि पदांची संख्या जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी कारागृह विभागाच्या संकेतस्थळावरील भरतीची सविस्तर जाहिरात पाहावी. या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 1 जानेवारी रोजी 16 पेक्षा कमी आणि 38 पेक्षा जास्त नसावे, तर मागासवर्गीय उमेदवारासाठी ही वयोमर्यादा किमान 18 आणि कमाल 43 वर्षे ठेवण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परीक्षेचे स्वरूप

या पद भरतीसाठी पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये लिपिक पदासाठी 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे, तर इतर पदांसाठी 120 मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे. दोन्ही परीक्षेसाठीचा कालावधी वेगवेगळा (120 मिनिटे आणि 80 मिनिटे) असेल याची परीक्षार्थींनी नोंद घेणे आवश्यक आहे. परीक्षेत पात्र होण्यासाठी उमेदवारांना किमान 45% गुण मिळवणे अनिवार्य आहे. भरतीसाठी तोंडी मुलाखत घेतली जाणार नाही. गुणवत्तेच्या आधारावर अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. परीक्षेची तारीख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

परीक्षा शुल्क

परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवाराने पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. भरतीसाठी अर्ज सादर करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 1000 रुपये, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्काची आकारणी केली जाणार आहे. परीक्षा शुल्क विनापरतावा असून उमेदवाराने ते ऑनलाईन पद्धतीने मुदतीच्या आत भरायचे आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र कारागृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी अथवा पुढील लिंकच्या माध्यमातून सविस्तर जाहिरात पाहावी. जाहिरात लिंक-https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1119126879185375351167.pdf

Maharashtra Prison Department
Sangli News: चंद्रहार पाटील 'वंचित' कडून? काँग्रेसच्या विशाल पाटलांचे काय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com