Shambhuraj Desai  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : शंभूराज देसाईंची ZP, पंचायत समितीसाठी कऱ्हाडमध्ये फिल्डिंग; शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांशी चर्चा

Shambhuraj Desai Meet Shivsena-NCP Leader : साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कऱ्हाडमध्ये दिवसभर मुक्काम करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी केली असून, शिंदे गटाचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 09 January : साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कऱ्हाडमध्ये दिवसभर तळ ठोकून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीसाठी बराच वेळ दिला. शिवसेनेचे कऱ्हाड दक्षिणेतील नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी यांची भेट घेऊन त्या निवडणुकांच्या अनुषंगाने चाचपणी केली. आगामी निवडणुकांत कऱ्हाड तालुक्यात पहिल्यांदाच शिंदे गटाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांनी फिल्डींग लावली असून त्याला कितपत यश येईल, हे लवकरच दिसून येईल.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर, स्वबळावर होणार की महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीद्वारे लढवल्या जाणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र, महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मात्र निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्या तीनही पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेशाचाही धडाका लावला आहे. त्याचबरोबर पक्षीय पातळीवर चाचपणीही सुरु केली आहे. जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समितीची आरक्षण सोडत झाली आहे, त्यामुळे तीनही पक्षांकडे आरक्षणानुसार निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जिल्हा परिषद, ११ पंचायत समितीसाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षांची तयारी सुरु आहे. यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे दिसत आहेत. कऱ्हाड दक्षिणमधील काँग्रेसचे स्थानिक नेते पहिलवान नानासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बंडानाना जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे दक्षिणमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

दरम्यान पालिकेतील आढावा बैठकीनंतर पालकमंत्री देसाई यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चाचपणी केली. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून कऱ्हाड दक्षिण-उत्तरमधील गट-गण यांच्याबाबत चर्चा केली.

त्यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपपमुख्यंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसेचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची भेट घेऊन त्यांच्याशीही आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा केली. आगामी निवडणुकांत कऱ्हाड तालुक्यात पहिल्यांदाच शिंदे गटाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांनी फिल्डींग लावली असून त्याला कितपत यश येईल, हे लवकरच दिसून येईल.

महायुती की स्थानिक आघाडी?

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर, स्वबळावर होणार की महायुतीद्वारे लढवल्या जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, कऱ्हाड नगरपालिकेतून आघाडीद्वारे निवडणूक लढवण्याचा पॅटर्न तयार झाला आहे. त्यामध्ये येतील त्या पक्षांना बरोबर घेऊन आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जाणार का, त्या लढवल्या गेल्या तर काय फायदा होऊ शकतो, याची चाचपणी करण्यात आल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT