ZP Elections : जिल्हा परिषद निवडणूका लांबली, इच्छुकांचा खिसा रिकामा; महिला मतदारांसाठी देवदर्शन,साडी वाटपच्या क्लृप्त्या!

Palgar ZP Elections : निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असलेल्या इच्छुकांना कार्यकर्ते व मतदारांना खुष करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवावी लागत आहे.
ZP Election
ZP Election Sarkarnama
Published on
Updated on

ZP Elections News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा महानगरांमध्ये धुराळा ऊडाला आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निवडणुका 50 टक्के आरक्षण आणि न्यायालयाच्या निकालाच्या कचाट्यात अडकल्याने लांबणीवर गेल्या आहेत. त्याचा मोठा फटका इच्छुक उमेदवारांना बसतो आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत, मतदार आणि कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना विविध क्लुप्त्या लढवाव्या लागत आहे. त्यामुळे त्यांचा खिसा रिकामा होऊ लागला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदत संपल्यानंतर बर्‍याच काळानंतर लागणार आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांनंतर आता महानगरापालिकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. मात्र, ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका वाढीव आरक्षण मुद्द्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका अधिकच लांबल्या आहेत. खरे राजकारण ग्रामीण भागातच खेळले जाते. याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीत येतो आहे.

या निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असलेल्या इच्छुकांना कार्यकर्ते व मतदारांना खुष करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवावी लागत आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात काही इच्छुकांनी महिलांना देवदर्शन, मराठी सिनेमा दाखवण्यासाठी महिलांना घेऊन जात आहेत. तर काही युवकांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करत आहेत.

ZP Election
Prashant Jagatap : शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसचा हात धरणाऱ्या प्रशांत जगतापांना 'भाजप'चा कठीण पेपर

वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना आर्थिक मदत देऊन आपले योगदान देत आहेत. वर्ष अखेरीस ओली, सुखी पार्टी देऊन कार्यकर्त्यांसह मतदारांना आकर्षित करत आहेत. या उपक्रमात सत्ताधारी भाजप- शिवसेनेतील इच्छुक ऊमेदवार या क्लुप्त्या लढवण्यात अग्रेसर आहेत. हे उपक्रम राबविताना, संभाव्य युती- आघाडी जाहीर होण्यापूर्वीच त्यांना आपले खिसे रिकामे करावे लागत आहेत.

21 जानेवारीच्या निकालाकडे लक्ष

जिल्हा परिषदेत 50 टक्के टक्के आरक्षण ओलांडलेल्या राज्यातील जिल्हा परिषदांबाबत न्यायालयात 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे. 31. जानेवारी पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, या कमी अवधीत हे सगळे सोपस्कार पूर्ण होतील का ? या बाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मात्र, या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेत संभाव्य इच्छुक उमेदवारांचा, कार्यकर्त्यांची मनधरणी करताना घामटा निघाला आहे.

ZP Election
Nashik MNS : राज ठाकरेंच्या मनसेसोबत मोठा गेम, माजी नगरसेविकेने आधी उमेदवारी अर्ज मागे घेतला अन् आता थेट भाजपध्येच प्रवेश केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com