Sharad Pawar-Gopichand Padlkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांकडे महाराष्ट्राच्या विकासाचं कुठलंही व्हिजन नाही; गोपीचंद पडळकरांची टीका

Vijaykumar Dudhale

Kolhapur, 28 July : शरद पवारांना काहीही करायचं नसतं. नुसती मिजासगिरी करायची, मोठेपणा करायचा आणि मी खूप काही करतो, असं भासवायचं असतं, अशा शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली.

आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) म्हणाले, शरद पवारांना फक्त राजकारण करायचंय आहे. जवळच्या पै-पाहुण्यांना मोठं करायचं आहे. त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत. त्याच्या पलीकडे त्यांचं कुठलंच व्हिजन नाही. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत कुठलंही व्हीजन दाखवलेलं नाही.

शरद पवारांना (Sharad Pawar) कुठलंही व्हिजन नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात कुठलेही व्हिजन दाखवलेलं नाही. अनेक वर्षे त्यांनी महाराष्ट्राचे सत्ताकारण केलं. मात्र, उसाला दर, दुधाला दरवाढ त्यांनी कधीही दिलेली नाही. युवकांसाठी त्यांनी कुठलेही काम केलेलं नाही, असा आरोप पडळकर यांनी पवार यांच्यावर केले.

इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागासंदर्भातही पडळकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, नऊ जागा निवडून आल्या तरी त्यांची इतकी छाती फुगलेली आहे, ज्यांच्या जागा कमी निवडून आल्या आहेत, त्यांनाच असं वाटतंय की, आपण भारत जिंकला आहे. पण, विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येणार आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी संविधानाचा विषय घेऊन तुम्ही लोकांना फसवलं. पण, विधानसभेत हा मुद्दा चालणार नाही. महाविकास आघाडीकडे राज्यात कुठलेही सक्षम उमेदवार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीतून धनगर समाजातील नेतृत्वाला अधिक जागा मिळाव्यात, यासाठी मी मागणी करत आहे. महायुतीने धनगर समाजाला 25 जागा द्याव्यात, अशी मागणी मी केली आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीला यश मिळेल, असं वाटत नाही. येत्या दोन महिन्यांत ते राज्यातील जनतेपर्यंत कसे पोहोचणार, याच्यावर त्यांच्या यशाचे भवितव्य अवलंबून आहे, असेही पडळकर यांनी नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT