Satara NCP News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. तसेच या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे शरद पवारांवरही टीका केली होती.पण आता खुद्द शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला का जाऊ शकलो नाही यापाठीमागचं कारण सांगितलं आहे.
सातारा जिल्ह्यातील जकातवाडी येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या विविध पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमानंतर खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी (ता.9) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले. तसेच शिंदे सरकारने बोलावलेल्या बैठकीला जाता आले नाही यावरही खुलासा केला. पवार म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत आज मुंबईत बैठक होती. मात्र, खराब हवामानामुळे या बैठकीस उपस्थित राहता येत नाही. सरकारने हा विषय चर्चेतून मार्गी लावण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बोलावलेल्या आरक्षणाविषयीच्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकलेल्या महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली होती. ते म्हणाले, “मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अगदी ठरवून ऐनवेळी संध्याकाळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला.
मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलायला त्यांना वेळ नाही. मात्र, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात. त्यासाठी त्यांना वेळ आहे. त्यामुळे एकप्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध घोषणांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विद्यार्थिनींना शंभर टक्के फी माफी या योजना निश्चितच चांगल्या आहेत. मात्र, सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनांसाठी तरतूद न करता अर्थसंकल्पानंतर सरकार अशा घोषणा जाहीर करत आहे.
त्यामुळे भविष्यात या योजनांची शाश्वती देता येत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारच्या घोषणांवर केली. देशाला चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न जनतेने लोकसभा निवडणुकीत हाणून पाडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने जनता निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वास्तविक, या दोन्ही योजना चांगल्या असून, सरकार जर या योजनांना निधी देणार असेल आणि महिलांना लाभ मिळणार असेल, तर आम्हीही जास्तीतजास्त महिलांना मार्गदर्शन करून त्यांचे अर्ज भरण्यासाठी पुढाकार घेऊ असेही पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध घोषणांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विद्यार्थिनींना शंभर टक्के फी माफी या योजना निश्चितच चांगल्या आहेत. मात्र, सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनांसाठी तरतूद न करता अर्थसंकल्पानंतर सरकार अशा घोषणा जाहीर करत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार आपल्या संपर्कात असून, त्यांना पक्षात सामावून घेणार का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, ‘‘सध्या माझ्या संपर्कात कोणीही आमदार नाहीत. मात्र, जयंत पाटील यांच्या संपर्कात कोणी असतील, तर मला सांगता येणार नाही. निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला मान्यता दिल्याने विधान परिषद निवडणुकीत पक्षाची ताकद निश्चित वाढेल. पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतही न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तोही निकाल आमच्या बाजूने लागेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी या चिन्हामुळे आमच्या उमेदवारांना फटका बसला. सातारा लोकसभा मतदारसंघात देखील आम्हाला फटका बसला असल्याचे पवार यांनी यावेळी नमूद केले. देशाला चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न जनतेने लोकसभा निवडणुकीत हाणून पाडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने जनता निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाघनखांबाबत कोल्हापूरचे इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी जाहीर केलेल्या भूमिकेबाबत खासदार शरद पवार म्हणाले, ‘‘इंद्रजित सावंत यांच्या इतिहासातील कामाची मला कल्पना आहे. इतिहासामध्ये त्यांचा अभ्यास असून, योगदानही आहे. मी काही इतिहासाचा जाणकार नाही. मात्र, यातील जाणकारांचे मत एकदम दुर्लक्षित करू नये.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.