Supriya Sule, Sunetra Pawar, Saroj Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : शरद पवारांच्या बहिणीने स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या, शहाणी लोकं सुप्रियाला निवडून देतील....

Ajit Pawar : अभ्यासू नेता लोकसभेत पाठवायचा असेल, तर शहाणी लोकं सुप्रियाला निवडून देतील. पण, अजित पवार यांच्या कामाचा धडाका प्रचंड आहे, असेही सरोज पाटील म्हणाल्या.

Rahul Gadkar

Kolhapur Political News : शरद पवार आमचा वटवृक्ष असून, तो भक्कम आहे. या निवडणुकीचा परिणाम आमच्या घरफुटीवर होणार नाही. आमच्या सगळ्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम कमी होणार नाही. त्यामुळे लोकांनी याची चिंता करू नये.

आम्ही नेहमी घराच्या बाहेर राजकीय चपला काढून येतो. आमचं कुटुंब सुसंस्कृत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याची बहीण आणि दिवंगत नेते एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी पवार कुटुंबीयांवर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिले आहे.

प्रा. एन. डी. पाटीलदेखील शरद पवार यांच्यावर कडाडून टीका करायचे. मात्र, राजकारण संपलं की सगळे ढग निघून जातील. डोळ्याला पाणी आणणे हे दुबळेपणाचे लक्षण आहे. असे नेहमीच आमच्या आईने आम्हाला शिकवण दिली आहे, अशी प्रतिक्रिया सरोज पाटील यांनी दिली.

आम्ही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा काळदेखील पाहिला आहे. सध्याचा काळदेखील पाहत आहे. पण आतासारखा काळ कधीच पाहिला नव्हता. जर पुन्हा मोदी सरकार आलं तर लोकशाही संपून जाईल. शरद पवार यांना बाजूला केलं की, राज्य आपल्या हातात आलं हे भाजपला करायचं आहे.

आंब्याच्या झाडाला लोक दगड मारत असतात, अशा शब्दांत भाजपचा पाटील यांनी समाचार घेतला. शरद पवार यांच्यावर टीका होते त्याचे वाईट वाटतं. पण अजित पवार यांना लहानपणापासून ओळखते. अतिशय संवेदनशील आहेत. अजित पवार बोलता बोलता बोलले असतील. पण, त्यांना आता त्याचा पश्चाताप होत असेल, असेही सरोज पाटील म्हणाल्या.

बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीवरून बोलताना सरोज पाटील यांनी, माझं सुप्रिया आणि सुनेत्रा यांच्यावर प्रेम आहे. मात्र, सुप्रिया यांनी स्वतःमध्ये प्रचंड बदल केला आहे. 'बाप से बेटी सवाई' असं मला म्हणावं वाटतं. संसदेत अतिशय उत्तम भाषण करते. सुप्रियाताई यांचा अभ्यास प्रचंड आहे, खूप फिरते.

सुनेत्रा स्वभावाने अतिशय गुणी आहे. कुटुंबात चांगल्या पद्धतीने मिसळली आहे. पण, तिचा अभ्यास कमी पडणार, ते लोकांनी जाणलं तर सुप्रियाला मतं देणार. अभ्यासू नेता लोकसभेत पाठवायचं असेल तर शहाणी लोकं सुप्रियाला निवडून देतील. पण अजित पवार यांच्या कामाचा धडाका प्रचंड आहे, असेही पाटील म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शाहू महाराज नक्की निवडून येतील...

कोल्हापुरात महाविकास आघाडीने अतिशय चांगला उमेदवार दिला आहे. उमेदवार निष्कलंक आहे. जिभेवरचा तोल कधीही जात नाही. कोल्हापूरची जनता म्हणजे 'लई भारी' कुठे काही घडले तर ठिणगी कोल्हापुरात पडते. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेऊन ही जनता तयार झालीय. शाहू महाराज नक्की निवडून येतील यात शंका नाही, असा विश्वास सरोज पाटील यांनी व्यक्त केला.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT