Kolhapur Loksabha Election : कोल्हापुरात शिवसैनिकांना बोलता येईना अन् सांगलीत काँग्रेसला मिळवता येईना

Sangli kolhapur Loksabha Election : एकंदरीतच दोन्ही मतदारसंघांत कोल्हापुरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना बोलता येईना आणि सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलून पण घेता येईना, अशी परिस्थिती नेमकी होत चालली आहे.
Sangli kolhapur Loksabha
Sangli kolhapur Loksabha Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर अजूनही रस्सीखेच कायम आहे. कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार हे जवळपास निश्चित झाले असताना स्थानिक आमदारांनी मात्र ज्या त्या जागा आपल्याला मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून Kolhapur Loksabha Election जवळपास महाविकास आघाडीतील ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, त्या बदल्यात ठाकरे गटाने सांगलीची जागा आपल्याकडे घेतल्याचे बोलले जाते. मात्र, त्या जागेबाबत अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. वरिष्ठ नेत्यांच्यात कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघांबाबत जवळपास फॉर्म्युला निश्चित ठरला असल्याचे सांगितले जात असले तरी सांगलीच्या Sangli Constituency जागेवरून काँग्रेस आक्रमक होत आहे. एकंदरीतच दोन्ही मतदारसंघांत कोल्हापुरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना बोलता येईना आणि सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलून पण घेता येईना, अशी परिस्थिती नेमकी होत चालली आहे.

सुरुवातीला शिवसेनेच्या ठाकरे गटाने Uddhav Balasaheb Thackeray कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर ठाम दावा केला होता. मात्र, जसजसे शाहू महाराज छत्रपती यांचे नाव समोर आले. तस तसे कोल्हापुरातील शिवसैनिकांनी Shivsena या जागेवरचा दावा सोडत मवाळ भूमिका घेतली. ठाकरे गटाच्या भूमिकेचा विचार केल्यास कोल्हापूरच्या जागेवरचा दावा सोडण्यामागे शाहू महाराज आहेत. त्यांच्या गादीचा मान म्हणून शिवसैनिकांनी आपली भूमिका नमती घेतली. शिवाय ठाकरे गटाकडेही सक्षम उमेदवार नसल्याने आणि काँग्रेसच्या Congress आमदारांचे संख्याबळ पाहता त्यांनीदेखील ही जागा काँग्रेसला देण्यास सहमती दर्शवली असल्याचे सांगितले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sangli kolhapur Loksabha
Lok Sabha Election 2024 : शेट्टींचं ठरेना, हातकणंगलेच्या मैदानात ठाकरे गटाची पुन्हा चाचपणी, तीन माजी आमदारांमध्ये...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत Hatkanangle Lok Sabha Election 2024 भूमिका घेत असताना महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या वाट्याला जाणारी जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार असल्याची चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास या दोन जागा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची चिन्हे होती. कोल्हापूरची जागा काँग्रेसला देऊन सांगली लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यास ठाकरे गट तयार असल्याचे सांगितले जाते, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा सोडणार असल्याची चर्चा आहे.

मात्र, ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी Raju Shetty यांना विरोध केल्यानंतर त्यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले. याचीच धास्ती कोल्हापुरातील शिवसैनिकांना Uddhav Balasaheb Thackeray आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या खासदार आणि आमदारांना कोणत्याही परिस्थितीत नमवायचे ही भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत वाटचाल केली आहे. जर त्या भूमिकेच्या विरोधात कोणीही शिवसैनिक आल्यास त्याला पक्षातून हकलण्यात येईल, हाच इशारा मुरलीधर जाधव यांच्या कारवाईतून इतर शिवसैनिकांना दिला. त्यामुळेच लोकसभेच्या जागावाटप भूमिकेत स्थानिक शिवसैनिकांनी ही आपली भूमिका कुठेही उघड केलेली नाही. मातोश्रीवरून येईल तोच आदेश मानून शिवसैनिक ही कामाला लागले आहेत. त्यामुळेच कोल्हापूरची जागा मिळवत असताना एकाही शिवसैनिकाने छातीठोकपणे उघड उघड दावा केला नसल्याचे दिसून येते.

कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ Sangli Loksabha Constituency ठाकरे गटाकडे गेल्याचे सांगितले जाते. त्या ठिकाणी ठाकरे गटाकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर गेल्या पाच वर्षांपासून शड्डू ठोकून मैदानात उतरलेले काँग्रेसचे विशाल पाटील यांना ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, पाच वर्षांपासून कसून तयारी केलेल्या विशाल पाटलांची माघार घेण्याची तयारी नाही.

स्थानिक आमदारांना सोबत घेऊन त्यांनी केंद्रीय पातळीवर सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्यासाठी गळ घातला आहे. शिवाय काँग्रेसचे आमदार Vishwajeet Kadam यांनीदेखील काँग्रेसला जागा न मिळाल्यास टोकाची भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला आहे. तर खासदार संजय राऊत sanjay Raut यांनीदेखील सांगलीची जागा 100% आपल्याकडे असणार असे जाहीर केले आहे. एकीकडे कोल्हापूरच्या बाबतीत शिवसैनिकांची असणारी मवाळ भूमिका, सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस नेत्यांची असणारी टोकाची भूमिका यावरून पुढील काही दिवस महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरूच राहणार आहे. मात्र, कोल्हापूरच्या जागेबाबत उद्धव ठाकरे यांच्या धास्तीमुळे शिवसैनिकांना बोलता येईना आणि सांगलीच्या काँग्रेसचे आमदार व कार्यकर्त्यांना बोलून पण घेता येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Sangli kolhapur Loksabha
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे ठरेना, काँग्रेसचे ‘हे’ आमदार महायुतीकडून लढणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com