Satej Patil , Sharangdhar Deshmukh (1).jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News: सतेज पाटलांची साथ सोडलेल्या शारंगधर देशमुख यांच्यामुळे महापालिकेत काँग्रेसचं वाढलं टेन्शन

Sharangdhar Deshmukh Politics : कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे गटनेते हे प्रमुख पद देशमुख यांच्याकडे होते. त्यामुळे काँग्रेसमधील काही देशमुख यांना मानणारे नगरसेवक देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 2009 पासून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस वाढवणाऱ्या स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी अखेर पाटील यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघासह कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना धक्का बसला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात आमदार पाटील यांचे प्रमुख पदाधिकारी म्हणून शारंगधर देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती म्हणून देशमुख यांनी काम पाहिलेले आहेत.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघानंतर 2009 च्या राजकारणात नव्याने स्थापन झालेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तेव्हापासून शारंगधर देशमुख हे आमदार पाटील यांच्यासोबत आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांचा पराभव झाल्यानंतर देशमुख यांनी पाटील यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. 2019 च्या निवडणुकीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका देशमुख यांनी निभावली होती.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ ते मैदानात होते. मात्र कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी असा आग्रह देशमुख यांचा आमदार पाटील यांच्याकडे होता. मात्र, राष्ट्रवादीच्या राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्यानंतर देशमुख हे नाराज होते. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार पाटील यांच्यासोबत देशमुख यांचा दुरावाच राहिला.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे गटनेते हे प्रमुख पद शारंगधर देशमुख (Sharangdhar Deshmukh) यांच्याकडे होते. त्यामुळे काँग्रेस मधील काही देशमुख यांना मानणारे नगरसेवक देखील शिंदेंच्या सेनेत जाण्याची तयारीत आहेत. जवळपास 15 नगरसेवकांचा समावेश आहे. शिवाय ज्या मतदारसंघातून प्रमुख विजयाचे शिल्पकार होण्याची शक्यता आहे असे देखील देशमुख यांच्यासोबत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये सतेज पाटील यांचे समर्थक असल्याचे सांगितले जाते.

आमदार पाटील यांचे राजकीय गणित बिघडवणार

कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेसचे 30 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक आहेत. शिवसेना 4, ताराराणी आघाडी 19, भाजप 14 असे पक्षीय बलाबल आहे. वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकत्र येत कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता स्थापन केली. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहतात मुश्रीफ आणि क्षीरसागर हे महायुतीत आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे यांची सेना ही आमदार पाटील यांच्यासोबत आहे.

तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे यांची सेना ही आमदार पाटील यांच्यासोबत आहे. काँग्रेस सोडली तर या राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेची कोल्हापूर महानगरपालिकेत ताकद कुमकवत झाली आहे. अशा परिस्थितीत देशमुख यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका आमदार पाटील यांना बसणार आहे. शिवाय काही माजी नगरसेवक शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याने देखील यंदा काँग्रेसचे राजकीय गणित बिघडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT