Ravindra Dhangekar: पुण्यात पुन्हा 'धंगेकर पॅटर्न'! महापालिकेसाठी शिवसेनेची मुंबईत तातडीची बैठक, शिंदेंसोबत खलबतं

Eknath Shinde Shivsena Plan PMC Election : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधले असलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पक्षात घेतलं. यानंतर शिंदे सेनेकडून त्यांच्यावर पुणे महानगर प्रमुख या नव्या पदाची जबाबदारी सोपवून आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
Ravindra Dhangekar shivsena .jpg
Ravindra Dhangekar shivsena .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. माजी आमदार आणि पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी या विजयासाठी मास्टरप्लॅन तयार केला. धंगेकरांच्या पॅटर्नवर आधारित मास्टर प्लॅन शनिवारी (ता.7) धंगेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीत पुण्यातील काही ठराविक पदाधिकाऱ्यांचा सहभाग असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या चर्चेला उपस्थित राहणार आहेत. पुणे महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी शिंदे गट कोणती रणनीती आखतोय, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधले असलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनं पक्षात घेतलं. यानंतर शिंदे सेनेकडून त्यांच्यावर पुणे महानगर प्रमुख या नव्या पदाची जबाबदारी सोपवून आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात जागा जिंकून देऊ किंगमेकर च्या भूमिकेत अन्याच नियोजन धंगेकारांकडून करण्यात येत आहे. त्याच दृष्टिकोनातून धंगेकरांकडून महापालिका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक नेत्यांना संपर्क साधला जात असल्याचे देखील सांगितलं जात आहे.

Ravindra Dhangekar shivsena .jpg
BJP Politics : महापालिकेत सत्ता, शहरात तीन आमदार... तरी भाजपला सुधाकर बडगुजर का हवेत?

जिंकण्याची संभावना असणाऱ्या परंतु त्या त्या पक्षातून डावलल्या जाण्याची शक्यता असलेला नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न धंगेकर करत असल्याचा बोलत जात आहे. धंगेकरांकडून अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफरिकल दिल्या गेल्या असल्याचं बोललं जात आहे.

प्रभाग रचनेबाबतची शाश्वती आणि महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाचा तिकीट भेटेल याची गॅरंटी पक्ष प्रवेश करण्यापूर्वी अनेक इच्छुकांना हवी आहे. या प्रवेशनाबाबतच्या गोष्टी देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ravindra Dhangekar shivsena .jpg
BMC Election 2025 : इकडे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा... तिकडे दुखावलेल्या 'एकनाथ शिंदेंचा' मनसेच्या ताकदीवर शेवटचा घाव!

बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

* महापालिका निवडणुकीसंदर्भातील मास्टरप्लॅनवर विचारविनिमय

* शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युती झाल्यास शिंदे गटाची रणनीती काय असावी, यावर विचार

* पुणे महापालिका स्वबळावर लढवायची की युती करून, यावर चाचपणी

* आगामी काळात होणारे पक्षप्रवेश आणि इच्छुक नेत्यांचा पक्षप्रवेश संदर्भातील तयारी

* मुंबई-ठाण्यात भाजप-शिवसेना युती झाल्यास पुण्यात त्याचा परिणाम आणि स्थानिक युतीसंदर्भात निर्णय

या बैठकीतून शिंदे गटाची आगामी राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विशेषतः पुण्यात पक्ष स्वबळावर ताकदवानपणे लढेल का, की युतीचा पर्याय निवडेल, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com