Shivendraraje Bhosale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shakti Act Delay Issue : शक्ती कायद्याला विलंब का होतोय? शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितले कारण...

Shivendraraje Bhosale Statement : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा सर्व महापुरुष असू देत त्यांच्यावर बोललं की कडक कारवाई होते, हे उदाहरण कोणावर तरी झालं पाहिजे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 27 February : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणातील आरोपीस पुणे पोलिस लवकरात लवकर अटक करतील, अशी माझी खात्री आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. तसेच, शक्ती कायद्याला विलंब होण्याचे कारण सांगून अधिवेनात तो मंजूर होईल, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.

पुणे अत्याचार प्रकरणावर शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) म्हणाले, समाजात अशा पद्धतीची विकृती वाढत चालली आहे. या विकृतीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. या अगोदर घडलेल्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते आणि कारवाईही झाली होती.

पुण्यात (Pune) घडलेला प्रकारदेखील अतिशय निंदनीय आहे. पुणे असो किंवा कुठलेही शहर असो असे प्रकार घडता कामा नये. हा छत्रपती शिवरायांचा, जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. जिजाऊ होत्या, म्हणून शिवाजीराजे घडले. ज्या महाराष्ट्रात जिजाऊंचे नाव घेतले जाते, त्या महाराष्ट्रात अशी विकृत माणसं जन्माला येतात, हे दुर्दैव आहे, अशी खंतही शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला पुणे पोलिस लवकरच पकडतील. हे प्रकरण फास्टट्रॅकमध्ये चालवून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षाही मंत्री भोसले यांनी व्यक्त केली.

शक्ती कायद्याबाबत भोसले म्हणाले, शक्ती कायदा तयार आहे. मात्र, ज्या पद्धतीने तो आपल्याला अपेक्षित आहे, त्यासाठी त्यात बदल होणे गरजेचे आहे. त्यामुळे तो लांबलेला आहे. त्यामध्ये काही सुधारणा करून शक्ती कायदा नक्कीच अधिवेशनात मंजूर करून घेतला जाईल.

प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचाही शिवेंद्रराजे भोसले यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, महापुरुषांवर बोलण्याची फॅशन झाली आहे. मात्र, कोणावर तरी कडक कारवाई होऊन एक उदाहरण झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज किंवा सर्व महापुरुष असू देत त्यांच्यावर बोललं की कडक कारवाई होते, हे उदाहरण कोणावर तरी झालं पाहिजे.

महापुरुषांवर बोलणाऱ्या अटक होते. मात्र, थोडे दिवस जेलसुद्धा झाली पाहिजे. कोर्टात हजर केले असता कोर्टकडून लगेच जामीन दिला जातो. कायदा अजामीनपात्र असला पाहिजे. म्हणजे चार-आठ दिवस जेलमध्ये बसले पाहिजेत. कायदा आणत असताना त्याच्यातून पळवटा निघून नये, असा कायदा आणला पाहिजे. त्यातून आरोपीला सुटता आलं नाही पाहिजे. कायदा आला त्याला पळवटा असल्या की त्या पळवाटांचा वापर करून कायदा यायच्या आधी असे आरोपी त्याचा अभ्यास करून बसलेले असतात. कायदा येताच पळवटा हेरून ठेवल्या जातात आणि त्याच्यातून बाहेर पडतात, त्यामुळे शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा पाहिजे, असेही शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT