Phaltan, 18 March : श्रीराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून जोरदारपणे खिंड लढवली जात आहे. आमदार सचिन पाटील आणि शिवरूपराजे खर्डेकर यांच्यावर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही पलटवार केला असून ‘आजची तुमची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आमदार सचिन पाटील आणि शिवरूपराजे ही भाजपची बी टीम आहे का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
आमदार सचिन पाटील आणि शिवरूपराजे खर्डेकर यांनी निंबाळकर यांच्यावर आरोप केले होते. त्याला संजीवराजे नाईक-निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांनी उत्तर दिले आहे. संजीवराजे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दादाराजे खर्डेकर हे १९९८ मध्ये होते. मात्र, १९९९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या वेळी शिवरूपराजेही त्यांच्याबरोबर होते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल शिवरूपराजे यांनी आता प्रेम दाखवू नये. भाजपमध्ये जे प्रवेश होत आहेत, त्यात शिवरूपराजे दिसत आहेत फलटणची आजची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आमदार सचिन पाटील आणि शिवरूपराजे ही भाजपची बी टीम आहे का?
संजीवराजे म्हणाले, श्रीराम सहकारी साखर कारखाना (Shriram Sugar Factory ) मालोजीराजे नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९५७ मध्ये सुरू झाला. त्यानंतरच्या काळात शिवाजीराजे यांनीही तो उत्तर प्रकारे चालवला. विशेष म्हणजे श्रीराम कारखाना उभारताना दादाराजे हे फलटणमध्येही नव्हते. ते १९७२ मध्ये आले, दादाराजे यांनीही श्रीराम कारखान्यासाठी योगदान दिले आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.
फलटण तालुक्यातील संस्था चालल्या पाहिजेत, कारखाना बंद पडल्यानंतर तो चालवला पाहिजे, यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी शिवरूपराजे आणि विरोधकांनी एक रुपयाचीही ठेव दिली नाही. उलट फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे ठेवी दिल्या होत्या, अशीही आठवण संजीवराजे यांनी सांगितली.
श्रीराम कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला जात आहे. कामगारांच्या पगारीही वेळेत होत आहेत, कामगारांनी तब्बल १८ कोटींची देणी देण्यात आली आहेत. त्यांच्या फंडाचीही रक्कम देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच श्रीराम कारखाना सुरू ठेवला, यात दादाराजेसुद्धा होते. सहकारी तत्त्वावर चालणारा श्रीराम हा एकमेव कारखाना आहे, तो सभासदांचाच राहणार आहे, असेही संजीवराजेंनी विरोधकांना ठणकावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.