Shahaji Bapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil : सांगोल्यात राजकारण तापलं; 'काय झाडी, काय डोंगार' फेम शहाजी बापूंची गाडी फोडली, 'करारा जवाब मिलेगा...'

ShivSena Shahaji Bapu Patil Eknath Shinde Solapur Sangola Constituency : सांगोला विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत शिवसेना महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पराभव झाला आहे.

Pradeep Pendhare

Solapur News : राज्यात महायुती सरकार स्थापन झालं आहे. आजपासून तीन दिवस विशेष हिवाळी अधिवेशन होत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बैठका देखील सुरू आहेत. पण निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि त्यातून दुखवली गलेली मने अजून अस्वस्थ आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये राजकीय खुन्नस वाढली आहे.

यातून सांगोला मतदारसंघातील काय झाडी, काय डोंगार फेम शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या पुतणे सागर पाटील यांचे वाहन काही अज्ञात व्यक्तींनी फोडले. या हल्ल्यावर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून, 'करारा जवाब मिलेगा...', असा इशारा दिला आहे. यामुळे हा राजकीय संघर्ष आगामी काळात पेटतच राहणार, असे संकेत आहेत.

माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुतणे सागर पाटील यांची कार सांगोला इथल्या कार्यालयासमोर उभी होती. त्यावेळी या कारवर अज्ञातांनी दगडफेक केली. यामुळे शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतप्त आहेत. कारच्या मागील बाजूस असलेल्या काचेवर दगडफेक करुन ती काच फोडण्यात आली आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली. महायुतीमधील शिवसेना उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पराभव झाला आहे. महाविकास आघाडीतील (MVA) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांचाही पराभव झाला. येथून बाबासाहेब देशमुख विजयी झाले.

अटीतटीच्या लढतीत शहाजी बापू पाटील यांना घरीच बसावं लागलं. यातच त्यांच्याच कार्यालयासमोर त्यांचे पुतणे सागर पाटील यांची कार काही अज्ञात तरुणांनी फोडली. शहाजी बापू पाटील यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यालयात असताना हा प्रकार झाला. दगडफेक करणारे तरुण पळून गेले. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांचा इशारा

शहाजी बापू पाटील कार्यालयात नसताना हा प्रकार घडला. या प्रकारानंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, करारा जबाव मिलेगा, असे कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे. तसेच सोशल मीडियात यावरून वाॅर रंगले आहे.

पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्याचा शोध

या हल्ल्यानंतर शिवसैनिक संतप्त आहेत. कार फोडल्याचा निषेध करत असून, करार जबाव मिलेगा, असा इशारा देत दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. भ्याड हल्ला करणाऱ्यांचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी देखील केली आहे. या हल्लामागे नेमकं कोण आहे, गाडीच्या काचेवर दगड कोणी मारला, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT