Madhukar Pichad : आदिवासी समाजाचे कैवारी अन् राजकारणातला 'बापमाणूस'

Political News : आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी मधुकर पिचड नेहमी प्रयत्नशील राहिले. त्यांनी आदिवासी भागात मोठं काम केले. आदिवासी समाजातील नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने करीत न्याय मिळवून दिला होता.
Madhukar Pichad
Madhukar Pichad Sarkarnama
Published on
Updated on

Nagar News : जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणास सुरूवात केली होती. त्यानंतर सलग सातवेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, आदिवासी विकास मंत्री म्हणून अकोलेच्या‌ जनतेचे प्रतिनिधीत्व मधुकर पिचड यांनी केले. त्यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी प्रदीर्घ काळ राहिली. त्यांनी अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरता अथक प्रयत्न केले. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले. आदिवासी समाजातील नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने करीत न्याय मिळवून दिला होता. त्यामुळे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहणारे आहे. (Madhukar Pichad News )

2019 विधानसभा निवडणुकीपूर्वीचं चित्र आठवतंय. लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचं राजकारण सैरभैर झालं होतं. भाजपचा जोर वाढला होता. राज्यात भाजपच सत्ता मिळवणार, हे गृहीत होतं. त्यामुळं राज्यभरातील दिग्गज नेत्यांनी भाजपची (BJP) वाट धरली होती. यातच राजकीय वारसदारांना लाॅचिंग करण्याचं दिव्य नेत्यांसमोर होतं. सत्तेपासून दूर जावा लागू नये म्हणून नेत्यांनी आपल्या वारसदारांना भाजपची वाट धरायला लावली. यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून 30 पेक्षा अधिक दिग्गज मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिग्गज नेते, मंत्री, आमदार, माजी आमदारांचा यात समावेश होता.

Madhukar Pichad
CM Devendra Fadnavis : जुने मित्र, आता कट्टर प्रतिस्पर्धी! फडणवीस ठाकरेंच्या भेटीसाठी लास्ट टाईम 'मातोश्री'वर केव्हा गेले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड (Madhukar Pichad) यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुलाच्या इच्छेखातर आपण भाजपमध्ये जात आहोत, असे सांगून मधुकरराव पिचड देखील भाजपमध्ये डेरेदाखल झाले. मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मधुकरराव पिचड यांचे सत्तेतील राजकीय प्रवास प्रदीर्घ, असा राहिला आहे.

Madhukar Pichad
Devendra Fadnavis : फडणवीसांनी दाखवलेला 'हा' आशेचा किरण राज्यावर प्रकाशाचा वर्षाव करणार, की...?

माजी कॅबिनेट मंत्री राहिलेले मधुकरराव पिचड 1980 ते 2009 पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. 1980, 1985, 1990, 1995 या चार पंचवार्षिकमध्ये सलग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून अकोले विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. या काळात त्यांना आदिवासी, आदिवासी विकास, दुग्धविकास, प्रवास विकास, पशु संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयात काम पाहिले.

Madhukar Pichad
Shivsena News : खातेवाटपावरून शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य; म्हणाले, 'मंत्रिपदाचे वाटप करताना...'

मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापन केली, तेव्हापासून मधुकरराव पिचड त्यांच्याबरोबर होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 1999, 2004 व 2009 असे सलग तीनदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले.

यानंतर त्यांनी 2014 मध्ये त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना अकोले मतदारसंघात राजकीय वारसदार म्हणून उतरवत विजयी केले. याचवेळी देशात मोदी लाट होती. या लाटेचे तडाखे काँग्रेससह देशातील सर्वच पक्षांना बसले. देशात भाजपनं मोठं सत्तांतर घडवून आणत केंद्रात सत्ता स्थापन केली. या मोदी लाटेचा प्रभाव 2019 मध्ये कायम राहिला. लोकसभेत भाजप बहुमतानं केंद्रात आली. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार होत्या. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Madhukar Pichad
Nana Patole : निमंत्रण दिले असते, तर शपथविधीला गेलो असतो; नाना पटोलेंची गुगली

पराभव जिव्हारी

आमदार असलेले वैभव पिचड यांनी देखील भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 'बालहट्ट' असल्याचा सांगत मुधकरराव पिचड यांनी पुत्र वैभवबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला. पिचड पिता-पुत्रानी ज्यापद्धतीने साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तो शरद पवार यांच्या जिव्हारी लागले. विधानसभेच्या तोंडावर पिचडांनी साथ सोडल्यानं, शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंसह सर्वांनीच अकोल्यात विधानसभा 2019 मध्ये ताकद लावली.

पिचड यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार स्वतः अकोलेच्या मैदानात उतरले. एकास एक, असा उमेदवार देत अजित पवारांनी वैभव पिचड यांच्या विरोधात विरोधकांना देखील एकत्र केले. परिणामी वैभव पिचड यांचा पराभव झाला. किरण लहामटे यांचा विजय घडवून आणला. पिचड यांचा पराभव म्हणजे, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पवारांनी लावलेला सुरुंग होता. इथून पिचड यांच्या राजकीय अस्तित्वाचा संघर्ष सुरू झाला होता.

Madhukar Pichad
Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या मागणीमुळे लाडक्या बहि‍णींना आतापासूनच 2100 रुपये मिळणार, नेमकं काय म्हणाल्या?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com