Manoj Jarange Patil Video : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच मनोज जरांगेंची भाषा बदलली, म्हणाले, 'डोक्यावर घेऊ...'

Manoj Jarange Patil Devendra Fadnavis Maratha Reservation : आमच्या समजाच्या लोकांनी मतदान केले आमदार निवडून आणले आत्ता त्याच आमदारांना समाजातील पोरं आरक्षणासाठी काय करणार असे प्रश्न विचारणार आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Devendra Fadnavis-Manoj jarange Patil
Devendra Fadnavis-Manoj jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Video : मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे म्हटले आहे. आधीही आम्हीच निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पुढेही आम्हीच न्याय देऊ, असे फडणवीस म्हणाले. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे.

'जनतेने निवडून दिले आहे. जनतेचे मन पुन्हा पुन्हा जिंकायचे असते. त्यांना द्यायचे असते. जर ते (देवेंद्र फडणवीस) मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे म्हटले असतील तर चांगली गोष्टी आहे. त्यांनी ते केलं तर मी मागेच म्हटलो होतो की समाज त्यांचं अभिनंदन करेल, त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल. आत्ताही तेच करेल', असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis-Manoj jarange Patil
Devendra Fadnavish : देवाभाऊंनी वाढवलं जुन्या मंत्र्यांचं टेन्शन; प्रगतीपुस्तक पाहूनच पुन्हा देणार संधी VIDEO पाहा

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना देखील प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते मला राजकारणात पडायचे नाही. मी आरक्षणासाठी लढतो आहे. राजकारणाचा नाद असता, स्वार्थी असतो तर माझ्या समाजाचे लोक उभे केले असते. माझ्या समाजाला डाग लागेल असे मी एकही पाऊल उचलले नाही.

आमच्या समजाच्या लोकांनी मतदान केले आमदार निवडून आणले आत्ता त्याच आमदारांना समाजातील पोरं आरक्षणासाठी काय करणार असे प्रश्न विचारणार आहेत. आरक्षणासाठी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल, असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.

समाज मोकळा सोडला

मनोज जरांगे पाटील म्हणाले, लोकसभेला जसा मी माझा समाज मोकळा सोडला होता तस विधानसभेला देखील मोकळा सोडला. माझा समाज माझ्या ऐकण्यात आहे. मी कोणाच्या स्वार्थीसाठी त्याला कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधू शकत नाही. आता निवडणूक झाली आहे. आमचा लढा हा आरक्षणासाठी आहे.

सरकार सत्तेत आले आहे त्यामुळे त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावेत. पाच जानेवारीपर्यंत मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis-Manoj jarange Patil
Municipal Elections : कोल्हापुरात राजकारण फिरलं; महायुती फुटणार, महाविकास आघाडीलाही तडे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com