Aditya Thackeray, Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या सभेत गाैप्यस्फोट...; 'शंभूराज देसाई 2004 साली शिवसेना पक्षातून बाहेर...'

Vishal Patil

Satara News : शिंदे गट- ठाकरे गटापैकी शिवसेना कुणाची आणि आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी(ता.10) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालानंतर आता दोन्ही गटातील राजकीय संघर्ष यापुढे आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील तळमावले (जि. सातारा) येथे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली.

या सभेत शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी एक गाैप्यस्फोट केला असून 2004 साली शिवसेना पक्षात झालेल्या भूकंपातही पक्षातून बाहेर पडणारे नेते हे पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई असल्याचे सांगितले आहे.

तळमावले (ता. पाटण) येथील जाहीर सभेला माजी मंत्री आदित्य ठाकरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे- पाटील, सचिन आचरे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हर्षद कदम म्हणाले, 2019 मध्ये उध्दव ठाकरे यांनी एक महाविकास आघाडीचा प्रयोग केला. यामध्ये पाटण तालुक्यात लहान मूल जन्माला आलं, ते मूल (शंभूराज देसाई यांचा लहान मूल म्हणून उल्लेख) सतत रडत आहे.

शंभूराज देसाईंनी(Shambhuraj Desai) 1997 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थित सत्तेत असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला. चारवेळा पराभव पाहिल्यानंतर पहिला गुलाल उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांच्यावर पडला, त्याचा विसर त्यांना पडला आहे. त्यांना पक्षाने सहकार परिषदेचा लाल दिवा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2004 मध्ये शिवसेना पक्षात पहिल्यांदा एक भूकंप झाला, त्यावेळीसुध्दा पक्षातून बाहेर जाणारे पहिले शंभूराज देसाईंच होते. परंतु, पुन्हा पक्षात आले. 1997 पासून सलग 26 वर्षे पाटण तालुक्यात एकही निवडणूक शिवसेना पक्षाच्या चिन्हावर लढली नाही, केवळ स्वतःचा गट निर्माण केल्याचा आरोपही केला आहे.

...ते दुसऱ्यांना निष्ठा शिकवत आहेत 

तळमावले- ढेबेवाडी विभागातील जवळपास 50 हजार लोक मुंबईला रोजंदारीवर काम करतात, परंतु, येथील आमदरांनी कोणासाठीही रोजगारांच्या संधी निर्माण करून दिल्या नाहीत. केवळ  आयत्या पिठावर रेघोट्या अोढून आपल्या भातावर डाळ कशी येईल एवढेच पाहिले आहे.

नारायण राणे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज बाबा (PrithviraJ Chavan) असतील, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे असतील किंवा आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. सत्तेतील सगळ्या बरोबर वेळोवेळी पायऱ्या बदलणारे आमच्या तालुक्याचे नेतृत्व करतात आणि हे दुसऱ्यांना निष्ठा शिकवत आहेत.  

'घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही...'

शंभूराज देसाईं स्वतः च्या कारखान्यात गेल्या 42 वर्षात एकही को- जनरेशनचा प्रकल्प सुरू करू शकले नाहीत. जिल्ह्यात इतर कारखान्याचा दर 3100 रूपये आहे. मात्र, यांच्या कारखान्याचा दर 2500 रूपये असून 600 रूपयांची तफावत आहे. ठाकरेंच्या घराणेशाहीवर तुम्ही बोलता मात्र, शंभूराज देसाई यांचे बंधू शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत.

तर मुलगा कारखान्याचा चेअरमन आहे. तेव्हा तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पाटण तालुक्यातील विनयभंग गुन्ह्यातील कार्यकर्त्या जामीनावर सुटल्यावर तो कार्यकर्ता पालकमंत्र्यांसोबत विमानातून फिरत असल्याची टीकाही हर्षद कदम यांनी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT