Akola News : एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निकालावर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर प्रतिक्रिया देत त्यांचा 'गधा' म्हणून उल्लेख केला आहे. अकोल्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला. मागील दीड वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षावर राहुल नार्वेकर यांनी बुधवारी निकाल दिला. राहुल नार्वेकरांच्या निकालावर विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांना सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश करायला पाहिजे असा सुंदर आणि आदर्श निकाल त्यांनी दिल्याचा उपहासात्मक टोला देशमुखांनी लगावला आहे. तर ते म्हणाले आम्हाला माहीत होतं की, असा एक गधा माणूस, गधाच निकाल देईल. त्यामुळे आम्ही काही या निकालाबाबत वेगळ्या अपेक्षा केल्या नव्हत्या. तर यापुढे पक्षप्रमुख निर्णय घेतील दरम्यान गुरुवार शिवसेना ठाकरे गटाची मुंबई येथे बैठक होणार आहे. त्यासाठी आम्ही मुंबईला निघालो असल्याचे देशमुख म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर अकोल्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोश केला. माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया, आमदार विपलव बाजोरिया यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर भाजप कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना पेढे भरवत आनंद साजरा केला. यावेळी आमदार रणधीर सावरकर, अनुप धोत्रे आदी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.