Eknath Shinde Shivsena  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena Convention : 100 हॉटेल्स बुक; 9 मंत्री, 43 आमदार, 13 खासदार कोल्हापुरात येणार

Rahul Gadkar

Kolhapur : शिवसेनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन कोल्हापुरमध्ये शुक्रवारपासून (ता. 16) होणार आहे. खु्द्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहे. मुख्यमंत्र्यांसह या अधिवेशासाठी नऊ मंत्री, 43 आमदार, 13 खासदार कोल्हापुरामध्ये येणार आहेत . शुक्रवार (ता.16), शनिवार (ता.17) असे दोन दिवस महासैनिक दरबार येथे हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक हॉटेलमधील दोन हजार खोल्यांचे बुकिंग शिवसेनेकडून करण्यात आले आहे. (Shivsena Convention )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतः दोन दिवस कोल्हापुरात असणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्‍घाटन होणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांनी दिली. अधिवेशनात तीन सत्र असतील. शनिवारी सायंकाळी गांधी मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. अधिवेशासाठी साधारण दोन हजारांहून पदाधिकारी सलग तीन दिवस कोल्हापुरात असतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होईल. पक्ष संघटनेच्या आढावा घेतला जाईल. पक्षाच्या दृष्टीने महत्त्‍वपूर्ण राजकीय ठराव मांडले जातील. त्यावर विचार विनिमय, चर्चा होणार आहे. ते राजकीय ठराव दुसऱ्या सत्रामध्ये मंजूर केले जातील. तिसऱ्या सत्रामध्ये निवडणुकांच्या तयारी संदर्भात चर्चा होईल. या सत्रात आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारीबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वरिष्ठ नेते आणि पदाधिऱ्यांमध्ये खुली चर्चा या सत्रात होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभेने अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेने होणार आहे. दरम्यान अधिवेशनासाठी पदाधिकारी गुरुवार (ता.15)पासून कोल्हापुरात येणार आहेत, अशी माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT